तिरंग्याचा अपमान करणाऱ्याचा जाळला पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:07+5:302021-02-05T07:15:07+5:30

कोल्हापूर : दिल्लीत लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वजाचा अपमान करणाऱ्या दीप सिंधूसह देशद्रोहींचा कोल्हापुरात बुधवारी सायंकाळी पुतळा जाळून निषेध नोंदविला. ...

Burnt statue of the one who insulted the tricolor | तिरंग्याचा अपमान करणाऱ्याचा जाळला पुतळा

तिरंग्याचा अपमान करणाऱ्याचा जाळला पुतळा

googlenewsNext

कोल्हापूर : दिल्लीत लाल किल्ल्यावर तिरंगा ध्वजाचा अपमान करणाऱ्या दीप सिंधूसह देशद्रोहींचा कोल्हापुरात बुधवारी सायंकाळी पुतळा जाळून निषेध नोंदविला. सर्वपक्षीय कृती समितीने मिरजकर तिकटी येथे आक्रमक आंदोलन करून धिक्काराच्या घोषणा दिल्या.

दिल्लीतील शेतकरी आंदोलनात तिरंगा ध्वज उतरवून दुसराच ध्वज फडकविला होता. बुधवारी यावरून आंदोलनात सहभागी असलेल्या दीप सिंधू याला संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर दिवसभर सर्वत्र संतप्त पडसाद उमटले. राष्ट्रध्वजाचा अपमान कदापिही सहन करणार नाही, अशा देशद्रोह्यांना कठोरातील कठोर शिक्षा करा अशी मागणी करत सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मिरजकर तिकटीला क्रांती स्तंभासमोर जमले. जोडे घातलेला देशद्रोह्यांचा प्रतीकात्मक पुतळाही तयार करून आणला होता. देेशद्रोह्यांचा निषेध आणि भारतमातेचा जयजयकार करत कार्यकर्त्यांनी पुतळ्याला आग लावली. आंदोलनात बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, संदीप घाटगे, प्रकाश घारगे, कुमार खोराटे, विजयसिंह पाटील, राजू कुरणे, अर्जुन नलवडे, प्रकाश डोंगळे, सुरेश टेलर, कुणाल भांदीगरे, सचिन देवकर, यासीन भालदार, अनिल झुरळे यांनी सहभाग घेतला.

फोटो: २७०१२०२१-कोल- तिरंगा ०१ , ०२

फोटो ओळ : कोल्हापुरात बुधवारी सायंकाळी सर्वपक्षीय कृती समितीने दिल्लीत तिरंगा ध्वजाचा अपमान करणाऱ्या द्रेशद्रोह्यांचा पुतळा जाळून निषेध नोंदविला.

Web Title: Burnt statue of the one who insulted the tricolor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.