सरकी तेलाची फोडणी महागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:21 AM2021-02-15T04:21:38+5:302021-02-15T04:21:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : सरकी तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली असून, किरकोळ बाजारात १३० रुपये किलोपर्यंत दर पोेहोचला ...

Bursting vinegar oil became expensive | सरकी तेलाची फोडणी महागली

सरकी तेलाची फोडणी महागली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : सरकी तेलाच्या दरात पुन्हा वाढ झाली असून, किरकोळ बाजारात १३० रुपये किलोपर्यंत दर पोेहोचला आहे. तूरडाळीनेही १२० रुपयांंचा टप्पा पार केला आहे. भाजीपाल्याच्या दरात चढ-उतार दिसत असून लाल मिरचीची मागणी वाढली आहे. ‘ब्याडगी’ मिरची २५० ते ३५० रुपये किलोपर्यंत आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून गोडेतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मात्र, मध्यंतरी ११० रुपयांपर्यंत सरकी तेलाचे दर आले होते. आता पुन्हा त्यात वाढ होत असून, किरकोळ बाजारात १३० रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. तूरडाळीचे दरही हळूहळू वाढू लागले आहेत. १२० रुपये किलोचा दर झाला आहे. हरभरा डाळ, मूग, मूगडाळीच्या दरात फारशी वाढ नाही. शाबूच्या मागणीत वाढ होत असल्याने आगामी आठवड्यात दरात थोडी वाढ होऊ शकते. लाल मिरचीला मागणी वाढत आहेत. मागणीच्या तुलनेत मिरचीची आवक नसल्याने दर तेजीत आहे. सर्वाधिक मागणी असणाऱ्या ‘ब्याडगी’चा दर २५० पासून ३५० रूपयांपर्यंत आहे. चटणीसाठी लागणाऱ्या मसाल्याची मागणी वाढली असली तरी दरात फारसा चढ-उतार दिसत नाही. तीळ १४०, जिरे २००, तर खोबरे १८० रुपये किलो असा दर आहे.

स्थानिक भाज्यांची आवक वाढली आहे. कोबी, फ्लॉवरसह पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात असल्याने दरात मोठी घसरण आहे. बाजारात समितीत रोज कोबीची साडेपाचशेहून अधिक पोत्यांची आवक होते. त्याचबरोबर स्थानिकही आवक मोठ्या प्रमाणात असल्याने दोन किलो कोबीचा गड्डा दहा रुपयाला मिळत आहे. फ्लाॅवरच्या दरातही घसरण झाली आहे. टोमॅटोच्या दरात फारसा चढ-उतार दिसत नाही. ढबू, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, दोडक्याचे दर स्थिर आहेत.

फळ मार्केटमध्ये द्राक्षांची आवक वाढली आहे. किरकोळ बाजारात दर ४० ते ६० रुपये आहे. कलिंगडची आवकही चांगली आहे. मात्र, उठाव नसल्याने दर घसरले आहेत. दहा ते वीस रुपये कलिंगडचा दर राहिला आहे. कांद्याच्या दरात काहीशी घसरण झाली असून, ३० ते ४० रुपये किलो आहे. बटाट्याचा दर २० रुपयांपर्यंत खाली आला आहे.

Web Title: Bursting vinegar oil became expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.