संचारबंदीच्या काळात व्यवसाय सुरू; दोन दुकाने सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:24 AM2021-04-24T04:24:18+5:302021-04-24T04:24:18+5:30

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स येथील समीर कम्युनिकेशन व योगेश टेलिकॉम ही दुकाने सकाळी ११ नंतरही सुरू ...

Business resumes during curfews; Seal two shops | संचारबंदीच्या काळात व्यवसाय सुरू; दोन दुकाने सील

संचारबंदीच्या काळात व्यवसाय सुरू; दोन दुकाने सील

Next

कोल्हापूर : मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स येथील समीर कम्युनिकेशन व योगेश टेलिकॉम ही दुकाने सकाळी ११ नंतरही सुरू ठेवल्यामुळे ही दोन्ही दुकाने शुक्रवारी महानगरपालिकेच्या परवाना विभागाने सील केली.

राज्य सरकारच्या आदेशानुसार शहरात सकाळी ११ वाजल्यानंतर औषधे दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवायची आहेत. या नियमाचे पालन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने पाच भरारी पथके स्थापन केलेली आहेत. या पथकांमार्फत शहरात विविध ठिकाणी फिरती करून दुकाने बंद ठेवली आहेत का, याची तपासली जात आहे. या पथकांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

संबंधित पथके अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त इतर सुरू असलेल्या दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत आहेत. पहिल्यांदा सूचना देऊनही पुन्हा दुकान उघडे असल्याचे आढळल्यास दुकान सीलबंद करण्याची कारवाई करण्यात येत आहे. शुक्रवारी महालक्ष्मी चेंबर्समधील दोन दुकाने सूचना देऊनही सुरूच होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. इस्टेट ऑफिसर सचिन जाधव, परवाना अधीक्षक राम काटकर यांनी ही कारवाई केली.

Web Title: Business resumes during curfews; Seal two shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.