सांगलीतील सावकारांच्या त्रासाला कंटाळून व्यापाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 06:10 PM2018-08-03T18:10:58+5:302018-08-03T18:14:10+5:30
सांगलीतील खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरातील व्यापाºयाने राहत्या घरी टेरेसवर गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. उमेश रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) असे त्यांचे नाव आहे.
कोल्हापूर : सांगलीतील खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून कोल्हापूरातील व्यापाऱ्याने राहत्या घरी टेरेसवर गळफास घेवून आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. उमेश रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी तेल उद्योगासाठी सावकारांच्याकडून तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते.
व्यवसायात आर्थिक मंदी आल्याने ते पैसे परत करु शकले नाही. त्यामूळे सावकारांनी त्यांचेकडे वारंवार तगादा लावला होता. ‘आमचे पैसे दे नाही तर, आत्महत्या कर’, अशी धमकी सावकारांनी दिली होती, अशी चिठ्ठी पोलीसांना मिळून आली आहे.
अधिक माहिती अशी, उमेश बजाज व त्यांच्या भावाने सांगलीतील माधवनगर भागात खाद्य तेलाचा उद्योग सुरू केला होता. या व्यवसायासाठी त्यांनी सांगलीतील काही खासगी सावकारांकडून व्याजाने पैशाची उचल केली होती. धद्यांत मंदी असल्याने त्यांना पैसे परत करता आले नाही. सहा महिन्यांपासून सावकारांनी मुद्दल व व्याजाची रक्कम परत देण्यासाठी तगादा लावला होता.
बजाज बंधूंनी आमच्याकडे पैसे नाहीत, मात्र पैशाची व्यवस्था झाल्यानंतर तुम्हाला पैसे देतो असे सांगितले होते. मात्र सावकारांनी पैशासाठी त्यांचेकडे सतत तगादा लावल्याने ते नेहमी चिंतेत असत. सकाळी नेहमीप्रमाणे घरातील सर्वजण उठले. उमेश दिसून आले नाहीत त्यामूळे घरातील लोकांना ते बाहेर फिरायला गेले असावे असे वाटले.
बराच वेळ झाला ते घरी न आल्याने शोधाशोध सुरु केली. यावेळी त्यांच्या मुलाला घराच्या टेरेसवर लोखंडी गजाला गळफास घेतल्याचे दिसून आले. वडीलांना अशा अवस्थेत पाहून त्याने आरडाओरड केली. घरातील व शेजारील लोक धावत वरती आले. त्यानंतर राजारामपूरी पोलीसांना कळविण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह सीपीआरच्या शवगृहात पाठवला आहे. त्यांचे नेत्रदान करण्याचा निर्णय कुटूंबियांनी घेतला आहे. त्यांचे आई-वडील मुंबईला आहेत. ते कोल्हापूरात आलेनंतर शवविच्छेदन केले जाणार आहे. यावेळी मृत उमेश यांच्या शर्टच्या खिशात चिठ्ठी मिळून आली. त्यामध्ये सांगलीतील सावकारांनी पैशासाठी तगादा लावला होता.
दोघा भांवापैकी एकाने आत्महत्या करा, आम्ही तुमचे पैसे माफ करतो, असे उल्लेख चिठ्ठीमध्ये मिळून आला आहे. ती पोलीसांनी जप्त केली. उमेश यांच्या आत्महत्याने कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
चिठ्ठीची चौकशी करुन गुन्हा
/>
मृत उमेश बजाज यांच्या आत्महत्येसंबधी सखोल चौकशी केली जाईल. त्यांनी लिहलेल्या चिठ्ठीची सत्यता पडताळून संबधीत सावकारांची चौकशी करुन गुन्हा दाखल केला जाईल.
औदूंबर पाटील :
पोलीस निरीक्षक, राजारामपूरी पोलीस ठाणे