कमी दरात स्टिल, लोखंडी बार देतो सांगून राजस्थानातील व्यापाऱ्याने बोरवडे येथील व्यवसायिकाची ३५ लाख रुपयांची केली फसवणूक

By विश्वास पाटील | Published: September 4, 2024 10:31 PM2024-09-04T22:31:34+5:302024-09-04T22:32:19+5:30

मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल          

businessman from rajasthan cheated a businessman from borawade of 35 lakh | कमी दरात स्टिल, लोखंडी बार देतो सांगून राजस्थानातील व्यापाऱ्याने बोरवडे येथील व्यवसायिकाची ३५ लाख रुपयांची केली फसवणूक

कमी दरात स्टिल, लोखंडी बार देतो सांगून राजस्थानातील व्यापाऱ्याने बोरवडे येथील व्यवसायिकाची ३५ लाख रुपयांची केली फसवणूक

विश्वास पाटील, कोल्हापूर : कमी दरात  स्टिल,स्टक्चर  लोखंडी बार, लोखंडी प्लेट, आय चॅनेल, सी चॅनेल इत्यादी साहित्य देतो असे सांगून कागल तालुक्यातील बोरवडे येथील महादेव राजाराम फराकटे यांची दिनेशकुमार मोती चौधरी राजस्थान राज्यातील व्यापाऱ्याने  35 लाख रुपयाची फसवणूक केल्या असल्याची तक्रार मुरगूड पोलीस ठाण्यात दाखल झाली. यामुळे कागल राधानगरी भुदरगड तालुक्याबरोबर कोल्हापूर शहरातील व्यापाऱ्यांच्यात खळबळ उडाली आहे.अनेक व्यापाऱ्यांना त्याने फसवले असल्याची  चर्चा मुधाळ तिट्टा येथे सूर आहे.

राधानगरी भुदरगड आणि कागल तालुक्याचे प्रवेशद्वार म्हणून मुधाळ तिट्टाची ओळख आहे. तर येथे मोठ्या प्रमाणात सर्वच व्यवसाय रुजले आहेत मात्र काही वर्षापासून परराज्यातील व्यापाऱ्यांनी कमी दरात साहित्य देतो असे सांगून डोके वर काढले आहे. तर या जाळ्यामध्ये अनेक जण फसले आहेत. कोल्हापूर  गारगोटी राज्य मार्गावर बोरवडे गावच्या हद्दीत आशापुरी स्टील ट्रेडर्स या नावाने दिनेशकुमार मोती चौधरी मुळ गाव- वहीपुर जिल्हा जालोर राज्य- राजस्थान  यांनी दहा वर्षापूर्वी  व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीला कमी साहित्य दिले यानंतर या परिसरातील लोकांचा विश्वास संपादन केला यामुळे अनेक जण त्यांच्या जाळ्यात फसलेत .

तर मुरगुड पोलीस ठाण्यात महादेव फराकटे यांनी आमची ३५ लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार दिली आहे यामध्ये आरोपीत याने त्रिवेणी कन्स्ट्रक्शन करीता लागणारे ९० टन स्टिल व स्टक्चर,लोखंडी बार, लोखंडी प्लेट, आय चॅनेल, सी चॅनेल इत्यादी साहित्य दोन दिवसात पुरवठा करतो असे सांगुन फसवणूक केली असल्याची तक्रार  दाखल झाले आहे. या घटनेमुळे राधानगरी,भुदरगड, कागल तालुक्याबरोबर कोल्हापूर शहरात व्यापाऱ्यांच्या खळबळ उडाली आहे. अनेकांची अशाच प्रकारे फसवणूक झाल्या असल्याची चर्चा सध्या मुधाळ तिट्टा परिसरात सुरू आहे.अधिक तपास मुरगुड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे करत आहेत.

Web Title: businessman from rajasthan cheated a businessman from borawade of 35 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.