पोत्यावरील किंमत पाहूनच खत खरेदी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:23 AM2021-05-18T04:23:57+5:302021-05-18T04:23:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : खत कंपन्यांनी खतांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र काही ठिकाणी जुन्या स्टॉकमधील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : खत कंपन्यांनी खतांच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र काही ठिकाणी जुन्या स्टॉकमधील खते नवीन दराने विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे खताच्या पोत्यावरील किंमत पाहूनच शेतकऱ्यांनी खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
खत कंपन्यांनी रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ केली आहे. ‘इफको’ ने १० : २६ : २६, १२ : ३२ : १६, २०:२०: ० व इतर कंपन्यांनी खताच्या दरात वाढ केली आहे. खत विक्रेत्यांकडे जुना स्टॉक आहे; मात्र वाढीव दराने विक्री केल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खताच्या पोत्यावरील किंमत पाहूनच त्याप्रमाणे पैसे द्यावेत, असे कृषी विभागाने सांगितले आहे.
असे आहेत दर, कंसात जुने दर -
इफको
१०:२६:२६ १७७५ (११७५)
१२:३२:१६ ११९० (१८००)
२०:२०:० ९७५ (१३५०)
डीएपी ११८५ ( १९००)
आयपीएल
डीएपी १२०० (१९००)
२०:२०:० ९७५ (१४००)
पोटॅश ८५० (१०००)
महाधन
१०:२६:२६ १२७५ (१९२५)
२४:२४:० १३५०(१९००)
२०:२०:०:१३ १०५० (१६००)
कोट-
खतांचे दर वाढले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे; मात्र शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना जुन्या की नवीन स्टॉकमधील खत, याची पडताळणी करावी, पोत्यावरील किमतीनुसारच विक्रेत्याला पैसे द्यावेत.
- चंद्रकांत सूर्यवंशी (कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद)