‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो’मध्येच ‘पाडवा’ खरेदी
By Admin | Published: March 7, 2017 12:14 AM2017-03-07T00:14:38+5:302017-03-07T00:14:38+5:30
उच्चांकी गर्दीत समारोप :
मुुख्य प्रायोजक एस. एस. कम्युनिकेशन अॅन्ड सर्व्हिसेस, तर असोसिएट प्रायोजक आदित्य पेरिफिरल्स प्रा. लि. कोल्हापूर : गेली तीन दिवस येथील राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील सभागृहात रंगलेल्या ‘लोकमत गॅझेट एक्स्पो २०१७’ प्रदर्शनाची सांगता सोमवारी हाऊसफुल्ल गर्दीतच झाली. ‘मेट्रो सिटी’मध्ये ज्या पद्धतीने प्रदर्शन भरविले जाते त्याच पद्धतीने भव्य आणि शिस्तबद्ध प्रदर्शनाचा समारोप झाला. प्रदर्शनात विविध वस्तू खरेदी आणि बुकिंगला भरघोस प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी गुढीपाडव्याच्या खरेदीचा मुहूर्त ‘लोकमत गॅझेट्स एक्स्पो’मध्ये साधला. ‘लोकमत’तर्फे राजारामपुरीतील डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवन येथे ‘लोकमत गॅझेट्स २०१७’चे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाचे मुुख्य प्रायोजक एस. एस. कम्युनिकेशन अॅन्ड सर्व्हिसेस, तर असोसिएट प्रायोजक आदित्य पेरिफिरल्स प्रा. लि. हे होते. दक्षिण महाराष्ट्रात पहिल्यांदाच भरविण्यात असलेल्या या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्व अद्ययावत गॅझेट्स पाहण्याच्या अनोख्या संधीसह खरेदीचा मनसोक्त आनंदही ग्राहकांनी या माध्यमातून घेतला. ‘एक्स्पो’चा सोमवारी शेवटचा दिवस असल्याने आणि सोमवारी एमआयडीला सुटी असल्याने सकाळी दहा वाजल्यापासून अनेकजण आपल्या कुटुंबीय, मित्रांसमवेत प्रदर्शन पाहण्यासाठी येत होते. प्रत्येक गॅझेटच्या स्टॉलवर जाऊन ग्राहक चोखंदळपणे प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूंची माहिती घेत होते. अनेक व्यावसायिक लाईव्ह डेमोच्या माध्यमातून ग्राहकांना माहिती देत होते. उत्पादनाचा दर्जा, सोयी-सुविधा, सुरक्षा यंत्रणा तसेच किंमत याचीही सविस्तर माहिती देण्यात येत होती. प्रत्येक स्टॉलवर अगदी छोट्या गोष्टींपासून मोठ्या घटकांपर्यंतच्या माहितीची ग्राहक विचारणा करत होते. मनपसंतीस उतरताच खरेदी किंवा नोंदणी केली जात होती. दिवसभर नागरिकांची प्रदर्शनात गर्दीच राहिली तसेच अनेकांनी आपली मनपसंत इलेक्ट्रॉनिक वस्तू घरी घेऊन जाणे पसंत केले तर अनेकांनी आपण कोणत्या कंपनीची वस्तू घ्यायची हे प्रदर्शनातून ‘फिक्स’ केले. यांचा होता समावेश .... सुभाष फोटोज, क्लिक लॅपटॉप गॅझेट्स, एच. पी., सिक्युअर आय (कॉसमॉस सेफ सिस्टीम), ऐवोसी टीव्ही, विप्रास टेक्नोमार्ट, सिप्ली सिटी सॉफ्टवेअर अॅन्ड सर्व्हिसेस, प्रोफेशनल टेक सोल्युशन प्रा. लि., आदी कॉम्प्युटर्स, हेली पॉवर सेव्हर, ओम साई एंटरप्रायजेस, नेट प्रोटेक्टर, जीओनी, आय पॅलेस, साई सर्व्हिस, ब्रदर, बॅटरी पॉवर सोल्युशन, दिशा कॉम्प्युटर्स, विवो, स्मार्ट, झेबॉन.