‘प्लॅन’ करून संजय राऊतांच्या माध्यमातून शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढविले: चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 06:35 PM2022-04-08T18:35:32+5:302022-04-08T19:29:05+5:30

परंतु एका मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात त्यांचा पूर्ण हिंदुत्वाचा पायाच उखडण्यात आला त्याचे काय, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.

By planning the distance between Shiv Sena and BJP was widened through Sanjay Raut says Chandrakant Patil | ‘प्लॅन’ करून संजय राऊतांच्या माध्यमातून शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढविले: चंद्रकांत पाटील

‘प्लॅन’ करून संजय राऊतांच्या माध्यमातून शिवसेना-भाजपमध्ये अंतर वाढविले: चंद्रकांत पाटील

Next

कोल्हापूर : ‘होय, मी शरद पवार यांचा माणूस आहे’ हे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं ते बरं झालं. पूर्णपणे ‘प्लॅन’ करून संजय राऊत यांच्या माध्यमातून शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढविण्यात आलं; परंतु एका मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात त्यांचा पूर्ण हिंदुत्वाचा पायाच उखडण्यात आला त्याचे काय, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

ते म्हणाले, केंद्रीय यंत्रणा स्वतंत्र आहेत. त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने सुरू आहे. त्याआधीही सेना-भाजपचे सरकार पाडण्याचा तीन वेळा प्रयत्नही झाला; परंतु २०१९ च्या निवडणुकीवेळी भाजप-शिवसेना यांच्यामध्ये अंतर कसे वाढेल याचा ‘प्लॅन’ करण्यात आला. राऊत यांनी तो राबवला.

हिंदुत्वाचा पायाही ठरवून काढून घेण्यात आला

आमच्या दोघांच्याही जास्त जागा आल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना फोन केला. तेव्हा त्यांनी आपण स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचे मला सांगितले. तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांना शंका आली. फडणवीस मला म्हणाले, त्यांची पत्रकार परिषद होऊ दे. मग आपण बोलू. त्या पत्रकार परिषदेत ठाकरे यांनी सर्व पर्याय खुले असल्याचे सांगितले आणि ‘प्लॅन’ वास्तवात आला; परंतु या सगळ्यांमध्ये त्यांचा हिंदुत्वाचा पायाही ठरवून काढून घेण्यात आला.

Web Title: By planning the distance between Shiv Sena and BJP was widened through Sanjay Raut says Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.