गटातटाच्या भक्कम तटबंदीचा ‘कागल’

By Admin | Published: September 16, 2014 12:00 AM2014-09-16T00:00:04+5:302014-09-16T00:08:36+5:30

जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ : दिग्गज नेत्यांची पिढी राज्याच्या राजकारणात

Caglong | गटातटाच्या भक्कम तटबंदीचा ‘कागल’

गटातटाच्या भक्कम तटबंदीचा ‘कागल’

googlenewsNext

जहाँगीर शेख - कागल -कोल्हापूर संस्थानाबरोबरच कागलची जहागिरीही भारतात विलीन झाल्यानंतर १९५० मध्ये ८० गावांचा कागल तालुका अस्तित्वात आला. १९९२ पासून कागल विधानसभा मतदारसंघ सुरू झाला. २००९ पर्यंत यात बदल नव्हता. कोल्हापूर जिल्ह्यातील १२ ऐवजी १० मतदारसंघ पुनर्रचित करण्याच्या प्रक्रियेत कागल मतदारसंघाला गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज शहर, कडगांव, कौलगे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि आजरा तालुक्यातील उत्तूर जि. प. मतदारसंघ जोडून हा नवा कागल विधानसभा मतदारसंघ बनविण्यात आला. पुनर्रचित नव्या मतदारसंघानंतरची ही आता दुसरी विधानसभा निवडणूक होत आहे.
गटा-तटाच्या भक्कम तटबंदीचा आणि कोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय विद्यापीठ अशी बिरुदावली मिळविलेल्या या मतदारसंघाने दिग्गज नेत्यांची पिढी राज्याच्या राजकारणाला दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय उलाढालीने जिल्ह्याच्या राजकारणाबरोबरच राज्याच्या राजकीय भूगोलात बदल घडवून दाखविले आहेत. १९५२ मध्ये पहिले आमदार शिक्षणमहर्षी एम. आर. देसाई (कोल्हापूर) अपक्ष म्हणून, तर १९५७ ला पहिल्या महिला आमदार विमलाताई कागल एकीकरण समितीकडून, तर १९६२ ला राज्याच्या राजकारणात ‘तरुण तुर्क’ म्हणून प्रसिद्ध झालेले शामराव भिवाजी पाटील (मौ. सांगाव) हे आणि १९६७ला स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांच्यारूपाने चौथा आमदार लाभला. मात्र, खऱ्या अर्थाने कागलचा राजकीय भूगोल बदलला तो १९७२ नंतर सदाशिवराव मंडलिक हे आमदार झाले. विक्रमसिंह घाटगेंचा राजकीय उदय झाला. १९७८ मध्ये घाटगे आमदार झाले. १९८० मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाले, तर १९८५ची विधानसभा ही प्रचंड राजकीय ईर्ष्येतून लढविली जाऊन अवघ्या २६१ मतांनी मंडलिकांनी घाटगेंचा पराभव केला. यानंतरच्या काळात हसन मुश्रीफ यांचा बोलबाला झाला.
प्रत्युत्तरादाखल संजय घाटगेंनाही ‘राजकीय ट्रॅक’ मिळाला. १९९५ पर्यंत मंडलिकांनी आमदारकी भूषविली. १९९८ला मंडलिक खासदार झाल्यामुळे पोटनिवडणुकीत संजय घाटगेंनी मुश्रीफांचा पराभव केला; मात्र १९९९ला राष्ट्रवादी कॉँग्रेसची स्थापना मुश्रीफांच्या पथ्यावर पडली. त्यांनी संजय घाटगे (कॉँग्रेस)चा पराभव केला. त्यानंतर १५ वर्षे ते आमदार, तर १४ वर्षे मंत्री आहेत. संजय मंडलिकांनीही २००९ची आमदारकी अजमावली. या मतदारसंघावर कॉँग्रेस, राष्ट्रवादी, एस कॉँग्रेस अशा कॉँग्रेशी विचारांचाच प्रभाव दीर्घकाळ राहिला. अपक्ष, शिवसेना, एकीकरण समिती यांनाही येथे संधी मिळालेली आहे.

घाटगे-मंडलिकांचा प्रभाव
या मतदारसंघावर सर्वाधिक प्रभाव विक्रमसिंह घाटगे आणि सदाशिवराव मंडलिक या दोन नेत्यांचाच राहिला आहे. मंडलिक चारवेळा, तर घाटगे दोनवेळा आमदार झाले आहेत. या दोघांपासून राजकीय कारकीर्द प्रारंभ करणारे हसन मुश्रीफ यांनी तीनवेळा, तर संजय घाटगेंनी एक वर्षाची आमदारकी भूषविली आहे. यापैकी मंडलिक-मुश्रीफ या दोघांनी जिल्ह्याच्या राजकारणावरही ‘कमांड’ ठेवली आहे.

Web Title: Caglong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.