रस्त्यावर तलवारीने कापला केक : आरसी गँगच्या चौदाजणांवर गुन्हा-दहशत माजविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 05:50 PM2019-04-02T17:50:54+5:302019-04-02T17:55:43+5:30
दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरसी गँगच्या चौदाजणांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कर्जदाराने थकीत कर्ज भरण्यासाठी दिलेल्या नऊ लाख रुपये रकमेचा गैरवापर करून त्यातील एक लाख ६३ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शुक्रवार पेठ, तेली गल्ली येथील श्री बसवेश्वर को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या
कोल्हापूर : सुभाषनगर हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर कार्यकर्त्यांचा वाढदिवस साजरा करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरसी गँगच्या चौदाजणांवर राजारामपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ३१ मार्चला रात्री हा प्रकार घडला.संशयित रवी सुरेश शिंदे, केदार सातपुते, गणेश पंडित बामणे, प्रकाश कांबळे, संदीप गायकवाड, योगेश पाटील, जावेद सय्यद, साई संभाजी कांबळे, शुभम दीपक मुळीक, अमित अंकुश बामणे, सनी राम साळे, सागर प्रभुदास व्हटकर, रणजित मारुती कांबळे, सागर सोनवणे (सर्व रा. सुभाषनगर) अशी त्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, सुभाषनगरमध्ये राहणारा केदार सातपुते याचा ३१ मार्चला वाढदिवस होता. तो आरसी गँगचा कार्यकर्ता असल्याने सुभाषनगर येथील हनुमान मंदिरासमोर रस्त्यावर तलवारीने केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. यावेळी ‘आरसी गँग जिंदाबाद,’ ‘हमसे जो टकरायेगा - मिट्टी में मिल जायेगा’ अशा घोषणा देऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. सराईत गुंड रस्त्यांवर उतरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली. या गोंधळाची माहिती पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक सुनील पाटील ताफ्यासही घटनास्थळी आले. पोलीस आल्याची चाहूल लागताच सर्वजण पसार झाले. कॉन्स्टेबल चंद्रकांत रामचंद्र अवघडे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.
हद्दपार गॅँगस्टर शहरात कसे
रवी शिंदे, रणजित कांबळे, अमित बामणे, सनी साळे हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, हाणामारी, खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांना हद्दपारही केले आहे. असे असतानाही ते शहरात वाढदिवस साजरा करतातच कसे? पोलिसांच्या नजरेत ते कसे काय येत नाहीत? पोलिसांशी सलगी वाढवून बिनधास्त शहरात वावरणाऱ्या या गॅँगस्टरना वेळीच चाप लावावा, अन्यथा भविष्यात जवाहरनगर-सुभाषनगर खूनसत्र पुन्हा सुरू होईल, अशी भीती येथील नागरिकांत आहे. .
बसवेश्वर सोसायटीमध्ये पावणेदोन लाखांचा अपहार
कोल्हापूर : कर्जदाराने थकीत कर्ज भरण्यासाठी दिलेल्या नऊ लाख रुपये रकमेचा गैरवापर करून त्यातील एक लाख ६३ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शुक्रवार पेठ, तेली गल्ली येथील श्री बसवेश्वर को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अधिकाऱ्यावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित राजेश संभाजी गवळी (वय ४४, डी वॉर्ड, गवळी गल्ली, शनिवार पेठ) असे त्याचे नाव आहे. श्री बसवेश्वर को-आॅपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मुख्य कार्यालयात १३ ते २३ नोव्हेंबर २०१३ दरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी सांगितले, सोसायटीचे तत्कालीन संचालक अनंत चंद्रकांत सांगावकर (४२, रा. ८०४, डी वॉर्ड, बाजारगेट) हे सोसायटीचे ‘अ’ वर्ग सभासद आहेत. त्यांनी सन २०११ ते २०१६ मध्ये संचालक म्हणून काम केले आहे. संशयित गवळी हा सोसायटीच्या मुख्य कार्यालयात अधिकारी म्हणून काम करतो. त्याच्याकडे कर्जवसुली, ठेवी स्वीकारणे, ठेवी देणे, आदी कामांची जबाबदारी आहे. सोसायटीच्या गडहिंग्लज शाखेतून कर्जदार मनोहर मारुती इंगवले (रा. नेसरी, ता. गडहिंग्लज) यांनी स्थावर तारण खात्यावर ३१ जानेवारी २००१ रोजी सहा लाख रुपये कर्ज घेतले होते. २००६ मध्ये सर्व शाखांचे कामकाज बंद करून संस्थेच्या शुक्रवार पेठ, तेली गल्ली येथील ‘बसव भवन’ येथे कार्यालय सुरू केले. या मुख्य कार्यालयात गवळी हा आॅफिसर म्हणून काम करतो. कर्जदार इंगवले यांचा ३० जानेवारी, २०११ रोजी मृत्यू झाला. संस्थेने त्यांच्या वारसदारांकडे वसुलीची प्रक्रिया सुरू केली. त्यावेळी अधिकारी गवळी याने दिलेले कर्ज एकरकमी परतफेड योजनेनुसार भरून घेण्यासाठी संस्थेच्या उपसमितीकडूनच या प्रकरणाची मंजुरी घेणे आवश्यक होते. संचालक मंडळाच्या सभेच्या मंजुरीनंतर कर्ज भरून घेणे गरजेचे असताना अधिकाराचा गैरवापर करून कर्जदार यांच्या वारसाकडून १२ नोव्हेंबर २०१३ रोजी ९ लाख रुपये परस्पर स्वीकारले. १३ ते २३ नोव्हेंबर २०१३ दरम्यान त्यांनी दिलेली रक्कम स्वत:साठी वापरली. नऊ लाख रुपयांपैकी कर्जदाराच्या खात्यावर २३ नोव्हेंबर रोजी सात लाख ३७ हजार रुपये भरले. उर्वरित १ लाख ६३ हजार रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी सांगावकर यांनी फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी संशयित गवळी याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.