पाल सापडल्याचा कांगावा म्हणजे बदनामीचे षङ्यंत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2021 11:05 AM2021-03-02T11:05:24+5:302021-03-02T11:20:08+5:30
cctv Kolhapur-जेवणात पाल सापडल्याचा बहाणा करून कांगावा करण्याचा प्रकार म्हणजे हॉटेलच्या बदनामीचे षङ्यंत्र आहे. या घटनेचे चित्रीकरण पाहिल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत आल्याचे मनोरा हॉटेलचे मालक निवास बाचूळकर यांनी शनिवारी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही दाखविले. या घटनेचा कोल्हापूर हॉटेल मालक संघानेही निषेध करून चौकशीची मागणी केली आहे.
कोल्हापूर : जेवणात पाल सापडल्याचा बहाणा करून कांगावा करण्याचा प्रकार म्हणजे हॉटेलच्या बदनामीचे षङ्यंत्र आहे. या घटनेचे चित्रीकरण पाहिल्यानंतर आम्ही या निष्कर्षापर्यंत आल्याचे मनोरा हॉटेलचे मालक निवास बाचूळकर यांनी शनिवारी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेजही दाखविले. या घटनेचा कोल्हापूर हॉटेल मालक संघानेही निषेध करून चौकशीची मागणी केली आहे.
बाचूळकर म्हणाले, शनिवारी (दि.२७) रात्री दहा ते बारा तरुण हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आले होते. कडेला बसलेल्या तरुणाने जेवण सुरू असतानाच मित्राची डीश आपल्यासमोर घेऊन मागील खिशातून पाल काढून त्या भाजीमध्ये टाकली असल्याचे दिसते. तो तरुण ही भाजी चमच्याने मिक्स करतो व डीश मित्राजवळ देतो. मित्र त्यातील भाजी वाढून घेऊन त्यातील पाल शोधतो, पण त्याला ती सापडत नाही.
शेजारचा मित्र पाल शोधून काढतो आणि समोरच्या मोकळ्या डीशमध्ये ठेवून मित्राला व्हिडिओ बनवायला सांगतो हे सगळे सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे. त्यानंतर मोबाइलवर त्यांनी जेवणामध्ये पाल सापडल्याचे चित्रीकरण केले. त्यासोबतच कर्मचाऱ्यांसोबतच हुज्जत घातली.
या तरुणांनी हॉटेलचे नाव वापरून तातडीने त्याची क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल केली. हा प्रकार म्हणजे हॉटेलची बदनामी करण्याचे षङ्यंत्रच आहे. त्यामुळे संबंधित तरुणांवर कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे.