संघटनांची १५ मिनिटांत बोळवण

By admin | Published: February 8, 2016 01:01 AM2016-02-08T01:01:41+5:302016-02-08T01:12:32+5:30

मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा : अवघ्या १५ मिनिटांतच विविध संघटनांशी चर्चा

Calling organizations within 15 minutes | संघटनांची १५ मिनिटांत बोळवण

संघटनांची १५ मिनिटांत बोळवण

Next

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी विविध संघटनेच्या शिष्टमंडळांशी येथील रेसिडेन्सी क्लबवर दुपारी अवघ्या १५ मिनिटांसाठी चर्चा करून त्यांच्याकडून मागण्यांची निवेदने स्वीकारली. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.केशवराव भोसले नाट्यगृह त्वरित सुरू करानूतनीकरणासाठी बंद असलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहास भेट देऊन पाहणी करावी व नाट्यगृह सुरू होण्यासाठी असणाऱ्या अडचणी निवारण करून त्वरित नाट्यगृह सुरू करावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. कोल्हापूर नाट्यपरिषदेच्या कार्यालयासाठी बांधलेली जागा उपलब्ध करून द्यावी, संगीतसूर्य केशवराव भोसले यांचा पुतळा नाट्यगृह आवारात उभारावा, अशी मागणी केली. या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष प्रफुल्ल महाजन, अध्यक्ष मनोहर कुर्इंगडे, शिवकुमार हिरेमठ आदींचा समावेश होता.बहुजन रयत परिषदबहुजन रयत परिषदेने मागासवर्गीयांच्या विविध प्रश्नांकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रालयात तातडीने बैठक आयोजित करावी, अशी मागणी परिषदेच्यावतीने माजी आमदार राजीव आवळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. सरकारने मागण्याबाबत गांभीर्याने दखल न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचाही इशारा यावेळी दिला. या शिष्टमंडळात आदिनाथ साठे, प्रशांत चांदणे, आब्रहम आवळे, अनिल लोंढे, विशाल चांदणे, उत्तम चौगुले, सुभाष सोनुले यांचा समावेश होता.
राज्य शेतमजूर युनियन
शेतमजुरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, शेतमजुरांना दोन लाखापर्यंतचा दवाखाना मोफत मिळावा, भूमिहीन शेतमजुरांच्या सरकारी गायरानामधील राहत असलेल्या घरांची अतिक्रमणे नियमित करावीत, घर बांधणीसाठी तीन लाख रुपये अनुदान द्या, किमान वेतन कायदा करा आदी मागण्यांचे निवेदन राज्य शेतमजूर युनियनने मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब कसबे, अनिल सनदी, संजय टेके, मंगळ आवळे, विमल कांबळे, अर्चना वडर, वत्सला भोसले, राजश्री लोंढे, कल्पना वडर उपस्थित होते.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया
बेलवळे बु. (ता. कागल) येथील वसंत पाटील यांनी गट नं. ७७९ या जमिनीची चुकीची मोजणी करून त्यासाठी मृत लोकांच्या खोट्या सह्णा केल्याबद्दल त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश द्यावेत, असे निवेदन रिपाइंच्यावतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले. पाटील यांनी शासनाची तसेच जमीन मालक तुकाराम कांबळे (रा. बेलवळे) यांची फसवणूक केल्याचा आरोप केला. चुकीचा अहवाल देणारे कागल तालुका भूमापन अधिकारी सुवर्णा पाटील यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख, तुकाराम कांबळे, पी. एस. कांबळे, भाऊसो काळे, जयसिंग जाधव, सज्जन कांबळे, भीमराव कांबळे आदी उपस्थित होते.
बांधकाम कामगारांचे निवेदन
बांधकाम कामगारांनी विविध मागण्यांचे निवेदन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भरमा कांबळे यांच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. कामगारांसाठीची २० आॅगस्टपासून बंद पडलेली मेडिक्लेम योजना तातडीने सुरू करा, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळावर ‘सिटू’चा प्रतिनिधी घ्या, कल्याणकारी मंंडळाची नोंदणी तसेच लाभ देण्यासाठी देण्यात येणारा ठेका रद्द करा व मंडळाचा स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करा, आदी मागण्या निवेदनात करून याप्रश्नी कामगार मंत्री व कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष यांच्यासोबत बैठक घ्यावी. यावेळी जिल्हा सेक्रेटरी शिवाजी मगदूम, जिल्हा उपाध्यक्ष भगवानराव घोरपडे, भाऊसाहेब कसबे, संदीप सुतार, आदी उपस्थित होते.

Web Title: Calling organizations within 15 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.