Kolhapur: जोतिबावरील मानाचे उंट, घोडे पोहाळेत दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 01:49 PM2024-06-26T13:49:09+5:302024-06-26T13:51:06+5:30

पोहाळे तर्फ आळते : जोतिबा डोंगर येथील मानाचे उंट व घोडे चार महिने विश्रांतीसाठी पोहाळे येथे दाखल झाले आहेत. ...

Camels, Horses of on Jotiba enter the Pohale kolhapur | Kolhapur: जोतिबावरील मानाचे उंट, घोडे पोहाळेत दाखल

Kolhapur: जोतिबावरील मानाचे उंट, घोडे पोहाळेत दाखल

पोहाळे तर्फ आळते : जोतिबा डोंगर येथील मानाचे उंट व घोडे चार महिने विश्रांतीसाठी पोहाळे येथे दाखल झाले आहेत. जोतिबा डोंगरावरील पावसाळ्यातील थंड हवा, दाट धुके, जोरदार पाऊस उंट व घोडे यांना मानवत नाही. परिणामी ते आजारी पडतात. 

जोतिबा डोंगरावर जोतिबा देवाच्या  पालखी सोहळ्यामध्ये उंट व घोडे यांना मानाचे स्थान आहे.  पावसाळ्यातील चार महिने वगळता वर्षभर प्रत्येक रविवारी सायंकाळी जोतिबा देवाचा पालखी सोहळा साजरा करण्यात येतो. पावसाळ्यात चार महिने पालखी सोहळा बंद असतो. यानंतर दस-यातील घटस्थापने दिवशी पुन्हा पालखी सोहळा सुरू होतो. या दरम्यान उंट व घोडे यांना विश्रांती दिली जाते. तसेच या कालावधीमध्ये जोतिबा डोंगरावर थंड हवा, दाट धुके, जोरदार पाऊस असतो. त्यामुळे उंट व घोडे यांची योग्य प्रकारे देखभाल करण्यासाठी जोतिबा डोंगराच्या‍ पायथ्याशी असलेल्या पोहाळे येथे आणले आहे. 

येथे उंट व घोडे यांच्या देखभालीसाठी देवस्थान समितीच्या मालकीची जून्या काळापासूनची इमारत आहे. या ठिकाणी देवस्थानच्या जमिनीतील गवत, त्यांना लागणारा खुराक आवश्याकतेनुसार औषधे यांचा पुरवठा देवस्थान समितीकडून करण्यात येतो. उंट व घोडे यांच्या देखभालीसाठी उंटवाला राजेंद्र भीमराव कचरे (कामाटी) व घोडेवाला किशोर अशोक भोसले (मोतदार) या दोन कर्मचाऱ्यांची देवस्थान समितीने नेमणूक केली आहे. ते पूर्णवेळ कार्यरत राहून उंट घोड्याची देखभाल करीत आहेत. दस-यापर्यंत यांचा मुक्काम पोहाळे येथे असणार आहे. 

Web Title: Camels, Horses of on Jotiba enter the Pohale kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.