सार्वजनिक कूपनलिकांचे पाणी तपासण्याची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:25 AM2021-07-29T04:25:49+5:302021-07-29T04:25:49+5:30
भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात आले होते. त्यांनी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याबरोबरच चर्चा केली. ...
भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक मल्लिनाथ कलशेट्टी मंगळवारी सायंकाळी कोल्हापुरात आले होते. त्यांनी महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्याबरोबरच चर्चा केली. त्यांनतर बुधवारी सकाळी दोघांनी संयुक्तपणे शहरात फिरती केली. स्वच्छता मोहीम तसेच सार्वजनिक कूपनलिकांची त्यांनी पाहणी केली.
कोल्हापूर शहरात ५५२ सार्वजनिक कूपनलिका (हातपंप असलेल्या) असून, ३८ विजेवर चालणाऱ्या कूपनलिका आहेत. पाणी टंचाईच्या काळात आधार ठरणाऱ्या या कूपनलिकांचे सर्वेक्षण करून त्याच्या पाण्याचे नमुनेही तपासण्याच्या सूचना मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केल्या होत्या. सर्वेक्षण व पाणी नमुने तपासण्याची मोहीम महापालिका व भूजल सर्वेक्षण विभागाचे कर्मचारी संयुक्तपणे करणार आहेत.
गेल्या दोन वर्षांत या कूपनलिकांकडे कोणीही फारसे लक्ष दिले नाही. परंतु जेव्हा शहरातील पाणीटंचाई निर्माण झाली, तेव्हा मात्र त्यांची आठवण झाली.