आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी राजू शेट्टींच्या प्रचारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 12:44 AM2019-04-19T00:44:36+5:302019-04-19T00:44:41+5:30

कोल्हापूर : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खासदार राजू शेट्टी यांनी संसदेत व रस्त्यावरची लढाई लढून ...

In the campaign of Raju Shetty, wife of suicidal farmers | आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी राजू शेट्टींच्या प्रचारात

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी राजू शेट्टींच्या प्रचारात

googlenewsNext

कोल्हापूर : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खासदार राजू शेट्टी यांनी संसदेत व रस्त्यावरची लढाई लढून ३४०० कोटींची मदत मिळवून दिली. घरच्या धन्याने आत्महत्या केल्यामुळे उघडा पडलेला संसार त्यामुळे सावरला गेला. या उपकाराची उतराई व्हावी म्हणून १०० वीरपत्नी शेट्टी यांच्या प्रचारात सहभागी झाल्या आहेत. शुक्रवारी त्या हातकणंगलेत दाखल झाल्या. प्रचाराच्या सांगतेपर्यंत गावोगावी जाऊन शेट्टींना निवडून देण्याचे आवाहन करणार आहेत.
दुष्काळाने नापिकीचा सामना करणाºया विदर्भ, मराठवाड्यातील शेतकºयांवर कपाशीवर पडलेल्या बोंड अळीने मोठा घाला घातला. डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या या शेतकºयांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. कुटुंब उघड्यावर पडल्याची दाहकता सहन न झाल्याने त्या भागाशी काहीही संबंध नसतानाही संवेदनशील शेतकरी या नात्याने खासदार शेट्टी यांनी धाव घेतली. नुकसानग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकºयांना नुकसानभरपाई मिळावी म्हणून विदर्भ, मराठवाड्यात रस्त्यावर उतरून लढाई सुरू केली. आंदोलने करतानाच संसदेतही आवाज उठवला. दबावगट तयार होऊन सरकारला ३४०० कोटींची नुकसानभरपाई जाहीर करणे भाग पडले. भरपाईमुळे आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबांना मोठा आधार मिळाला.
या उपकारातून उतराईसाठीच त्या प्रचारात उतरल्या आहेत. त्यानुसार जालना जिल्ह्यांतील गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालना, परभणी, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांतून या सर्वजणी दाखल झाल्या.

कपाशीच्या आंदोलनाची आठवण
कपाशीच्या दरावरून आंदोलन करताना गजानन पाटील यांच्यावर १९९७ मध्ये युती सरकारच्या काळात गोळीबार झाला होता. नागपूर-पुणे महामार्गावर आंदोलन करत असताना झालेल्या गोळीबारात त्यांच्यासोबतचे अमरावतीचे दोन सहकारी ठार झाले होते. पाटील यांना पायाला गोळी लागली होती. याची आठवण आजही मनांत असल्याने ताकदीने प्रचारात उतरल्याचे ते सांगतात.

शेतकºयांच्या अडचणीच्या काळात भावाप्रमाणे मदतीला धावून आलेल्या शेट्टी यांच्या उपकारांची परतफेड करण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकºयांसाठी झटणारा शेट्टींसारखा लोकप्रतिनिधी संसदेत पुन्हा पाठविणे आपले कर्तव्य आहे.
- गजानन पाटील-बंगाळे, टेंभुर्णी, जि. जालना

Web Title: In the campaign of Raju Shetty, wife of suicidal farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.