विद्यापीठात ‘कॅम्पस टू कार्पोरेट कनेक्ट’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:16 AM2021-07-19T04:16:48+5:302021-07-19T04:16:48+5:30

विद्यापीठाच्या वेबेक्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. दि. २५ जुलैपर्यंत रोज दुपारी चार वाजता ही व्याख्याने होतील. ...

‘Campus to Corporate Connect’ initiative at the university | विद्यापीठात ‘कॅम्पस टू कार्पोरेट कनेक्ट’ उपक्रम

विद्यापीठात ‘कॅम्पस टू कार्पोरेट कनेक्ट’ उपक्रम

Next

विद्यापीठाच्या वेबेक्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तज्ज्ञांची व्याख्याने होणार आहेत. दि. २५ जुलैपर्यंत रोज दुपारी चार वाजता ही व्याख्याने होतील. या उपक्रमात स्मार्ट सोल्युशनचे संचालक विजय सुंदर, ‘पीसीईटी’चे डॉ. शीतलकुमार रवंदळे, विश्‍वकर्मा कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सुनीता दलवाई ,‘आयएसबीएम’ या संस्थेचे प्रा. सचिन लेले, अ‍ॅकॅडमीच्या संचालिका पल्‍लवी देसाई मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती विद्यापीठाचे प्लेसमेंट अधिकारी डॉ. जी. एस. राशीनकर आणि उपक्रमाचे समन्वयक डॉ. नितीन माळी यांनी दिली.

डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये ऑनलाइन कार्यशाळा

कोल्हापूर : येथील डी. डी. शिंदे सरकार कॉलेजमध्ये डी. आर. के. कॉलेज ऑफ कॉमर्स क्लस्टर अंतर्गत ‘समाज माध्यमांचा समाजावरील परिणाम’ याविषयावर ऑनलाइन कार्यशाळा झाली. कार्यशाळेचे उद‌्घाटन सरस्वती शिंदे एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा माधुरी शिंदे आणि प्रथमेश शिंदे यांच्या हस्ते झाले. शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. जगन कराडे, जर्नालिझम विभागातील प्रा. शिवाजी जाधव, मिरज येथील बापूजी साळुंखे महाविद्यालयातील प्रा. सतीश देसाई यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. आर. शेवाळे होते. प्रा. विजय पाटील यांनी स्वागत केले. समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. कैलाश आंबुलगेकर यांनी आभार मानले.

Web Title: ‘Campus to Corporate Connect’ initiative at the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.