प्रारूप मतदार याद्यांत त्रुटी असल्याने रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:03 AM2021-02-20T05:03:57+5:302021-02-20T05:03:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग याद्यांचा अभ्यास केल्यानंतर याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महानगरपालिका प्रशासनाने तयार केलेल्या प्रारूप प्रभाग याद्यांचा अभ्यास केल्यानंतर याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या याद्याच रद्द कराव्यात, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने गुरुवारी उपायुक्त निखिल मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
भाजप संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाच्यावतीने उपायुक्त निखिल मोरे यांना प्रारुप मतदार याद्यांमध्ये असणाऱ्या त्रुटी दुरुस्त करण्याबाबत व या सर्व प्रक्रियेबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
प्रारुप मतदार याद्यांतील नावाच्या गोंधळाचा अवाका पाहता याद्या पूर्णपणे रद्द कराव्यात. प्रारूप मतदार याद्या पुन्हा तयार करताना कर्मचाऱ्यांना छाननीसाठी अधिकाधिक वेळ द्यावा. याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत प्रारुप मतदार याद्यांचा कार्यक्रम स्थगित करावा, असे निवेदनात नमूद केले आहे.
याप्रसंगी अशोक देसाई, हेमंत आराध्ये, चंद्रकांत घाटगे, अमोल पालोजी, धीरज पाटील, दिनेश पसारे यांनी यादीवरील हरकती सांगितल्या. याप्रसंगी दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, विजय अग्रवाल, संतोष माळी, विशाल शिराळकर, अतुल चव्हाण, दिनेश पसारे, गिरीश साळुंखे, प्रीतम यादव, इक्बाल हकिम, विशाल पाटील, गणेश चिले, ओमकार घाटगे, नजीम आत्तार, धीरज पाटील उपस्थित होते.
-भाजपच्या हरकती-
- प्रभाग ६ मधील बरीच नावे प्रारूप मतदार यादीत नाहीत.
- प्रभाग ४७ मधील देशपांडे गल्ली, खरी गल्ली परिसरातील बहुतेक सर्व मतदार प्रभाग क्रमांक ४८ मध्ये समाविष्ट.
- प्रभाग क्रमांक ४९ मधील बाबूजमाल परिसरातील शेकडो मतदार प्रभाग ४८ मध्ये समाविष्ट.
- प्रभाग क्रमांक ३२ व ३३ च्या सीमारेषेवरील मतदारांची अदलाबदल.
- प्रभाग क्रमांक २७, ३२ या प्रभागात देखील त्रुटी.