वाढीव वीज बिल रद्द करा, मनसेची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 07:34 PM2020-11-27T19:34:04+5:302020-11-27T19:36:01+5:30
coronavirus, mns, collectoroffice, kolhapurnews कोरोनामुळे मार्च महिन्यापासून कडक लॉकडाऊन झाले, व्यवसायांना घरघर लागली, आर्थिक नुकसान झाले, नोकऱ्या गेल्या. या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिला आहे. तरी हे वाढीव वीज बिल रद्द करावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २६) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
कोल्हापूर : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून कडक लॉकडाऊन झाले, व्यवसायांना घरघर लागली, आर्थिक नुकसान झाले, नोकऱ्या गेल्या. या परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारने नागरिकांना प्रचंड वीज बिल पाठवून शॉक दिला आहे. तरी हे वाढीव वीज बिल रद्द करावे, या मागणीसाठी गुरुवारी (दि. २६) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एप्रिल, मे, जून महिन्यांत अनेक खासगी आस्थापना बंद होत्या; तरीही त्यांना भरभक्कम वीज बिले पाठवण्यात आली आहेत. ही बिले रद्द करावीत, या मागणीसाठी ऊर्जामंत्री, राज्यपालांपर्यंतही विषय नेण्यात आला; मात्र यश आले नाही. बिलात १०० युनिटपर्यंत वीज देयकांमध्ये सवलत देऊ म्हणणाऱ्या ऊर्जामंत्र्यांनीही घुमजाव करून कोणतीही सवलत मिळणार नाहीत, असे जाहीर केले आहे.
हे सरकार जनतेलाच शॉक देणार असेल तर जनतेच्या वतीने सरकारला शॉक द्यावा लागेल. ही बिले रद्द केली नाही तर पायताण मोर्चा काढू, तसेच वीज तोडण्यासाठी वीज कर्मचारी असल्यास त्यांना त्याच खांबाला डांबून ठेवू, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हा सचिव यतिन होरगे, जिल्हाध्यक्ष गजानन जाधव, राजू दिंडोर्ले, विजय करजगार, दौलत पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.