उमेदवाराच्या चिल्लरने कर्मचारी घामाघूम-‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ चित्रपटाची आठवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 10:58 AM2019-04-03T10:58:14+5:302019-04-03T10:59:01+5:30

‘गल्लीत गोंधळ... दिल्लीत मुजरा...’ या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाची आठवण सोमवारी (दि. १) दुपारी झाली. कारण होते हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेल्या अपक्ष उमेदवार किशोर पन्हाळकर

Candidate's Chillar's Employee Ghamaghoom- 'Golly Gurbhal' in New Delhi reminds me of 'Mujra' | उमेदवाराच्या चिल्लरने कर्मचारी घामाघूम-‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ चित्रपटाची आठवण

उमेदवाराच्या चिल्लरने कर्मचारी घामाघूम-‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ चित्रपटाची आठवण

Next
ठळक मुद्देया चिल्लरची राजकीय वर्तुळासह संपूर्ण जिल्हाभर चर्चा सुरू होती.

कोल्हापूर : ‘गल्लीत गोंधळ... दिल्लीत मुजरा...’ या सुप्रसिद्ध मराठी चित्रपटाची आठवण सोमवारी (दि. १) दुपारी झाली. कारण होते हातकणंगले मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करायला आलेल्या अपक्ष उमेदवार किशोर पन्हाळकर यांनी अनामत रक्कम भरताना दिलेल्या चिल्लरचे. ती मोजताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची घामाघूम होऊन जवळपास दोन तास जागेवरून हालता आले नाही. या अनोख्या प्रकाराची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती.

पेठवडगाव येथील किशोर राजाराम पन्हाळकर हे २७ वर्षीय दिव्यांग मतदार आहेत. अर्ज भरण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ अशी आहे. अर्ज भरण्यास १५ मिनिटे शिल्लक असताना पन्हाळकर यांनी अपक्ष म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी नंदकुमार काटकर यांच्याकडे अर्ज सादर केला. यासोबत त्यांनी अनामत रक्कम म्हणून काही मोजक्या नोटा व पिशवीभर चिल्लर दिली. ही रक्कम मोजायची या कल्पनेने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली; परंतु दुसरा पर्याय नसल्याने संबंधितांनी हे पैसे मोजायला घेतले. पहिल्यांदा नोटा मोजायला सुरुवात केली. ही रक्कम साडेसहा हजार रुपयांची होती. उरलेली रक्कम ही चिल्लर असल्याने ती साडेसतरा हजार भरते का नाही? हे पाहण्यासाठी टेबलावर ती पसरून एक एक करून प्रत्येक कर्मचाºयाने ती मोजायला सुरुवात केली. एखाद्या बॅँकेतील कॅशिअरप्रमाणे पैसे मोजण्याचा सराव नसल्याने या कर्मचाऱ्यांची व अधिकाºयांची चांगलीच भंबेरी उडाली.

मोजलेली चिल्लर बरोबर आहे का नाही, याची अनेकवेळा खातरजमा झाली. जवळपास दीड तास ही प्रक्रिया सुरू होती. ती पूर्ण झाल्यानंतर अनामत रकमेची पावती उमेदवाराला देण्यात आली. उमेदवार पन्हाळकर यांना ही रक्कम मित्र मंडळींनी वर्गणी काढून दिल्याचे सांगण्यात आले; परंतु या प्रकाराने काही वर्षांपूर्वी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची भूमिका असलेला ‘गल्लीत गोंधळ...दिल्लीत मुजरा...’ या मराठी राजकीय चित्रपटाची आठवण झाली. उमेदवारांनी दिलेल्या या चिल्लरची राजकीय वर्तुळासह संपूर्ण जिल्हाभर चर्चा सुरू होती.

 हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार किशोर पन्हाळकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरताना अनामत रक्कम म्हणून चिल्लर दिली. ती मोजताना अधिकारी व कर्मचारी चांगलेच घामाघूम झाले.
 

 

 


 

 

Web Title: Candidate's Chillar's Employee Ghamaghoom- 'Golly Gurbhal' in New Delhi reminds me of 'Mujra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.