शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी आज बिंदू चौकात कॅण्डल मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:15 AM2021-02-05T07:15:19+5:302021-02-05T07:15:19+5:30

कोल्हापूर: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी आज सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बिंदू चौकात कॅण्डल मार्च काढला जाणार आहे. ...

Candle march in Bindu Chowk today in support of farmers' movement | शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी आज बिंदू चौकात कॅण्डल मार्च

शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी आज बिंदू चौकात कॅण्डल मार्च

Next

कोल्हापूर: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंब्यासाठी आज सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला बिंदू चौकात कॅण्डल मार्च काढला जाणार आहे. संध्याकाळी सहा वाजता मेणबत्ती, टॉर्च, मोबाईल टॉर्च यांच्या प्रकाशात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले जाणार आहे.

कृषी विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकरी ट्रॅ्क्टर रॅली काढली जाणार आहे. मंगळवारी होणाऱ्या या निर्णायक आंदोलनासाठी देशभरातून विविध मार्गाने पाठिंबा दिला जात आहे.

कोल्हापुरातही नेशन फॉर फार्मर्स कोल्हापूरच्या वतीने दिल्लीतील रॅलीला आणि शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज सोमवारी हे कॅण्डल मार्च होत आहे. घोषणा, गाणी आणि अन्नदात्यासाठी लढण्याचा निर्धार असे या मार्चचे स्वरूप असणार आहे. यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक रसिया पडळकर यांनी केले आहे.

Web Title: Candle march in Bindu Chowk today in support of farmers' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.