कॅप्टन दीपक शिंदे चषक मोगणे सहाराकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:22 AM2021-02-14T04:22:34+5:302021-02-14T04:22:34+5:30
///////////////////याव्बाळ पाटणकर/////////////////////////))))) लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या कॅप्टन दीपक शिंदे ‘अ’ गट क्रिकेट स्पर्धेच्या ...
///////////////////याव्बाळ पाटणकर/////////////////////////)))))
लोकमत न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या कॅप्टन दीपक शिंदे ‘अ’ गट क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् अकॅडमी ‘अ’ने फायटर्स स्पोर्टस् क्लबचा ६४ धावांनी पराभव करत विजेतेपद पटकाविले. राजाराम कॉलेज मैदानावर शनिवारी झालेल्या अंतिम सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना मोगणे सहारा संघाने ३७.१ षटकांत सर्वबाद २४४ धावा केल्या. यात ओंकार मोहिते ६६, भरत पुरोहितने ५०, प्रथमेश पाटीलने २३, राजवर्धन पाटीलने १२, स्मित पाटीलने ११, अल्केश कवाळे याने नाबाद १० धावा केल्या. फायटर्सकडून गोलंदाजी करताना मंथन पाटीलने तीन, तर निखिल कदम, प्रशांत कोरे यांनी प्रत्येकी दोन व अर्षद पठाण, उत्तम तंनगे यांनी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना फायटर्स संघाला हे आव्हान पेलवले नाही. त्यांचा सर्व संघ १८० धावांत गुंडाळला. यात निखिल कदमने ४४ व उत्तम तनंगे व प्रशांत कोरे यांनी प्रत्येकी ३७ धावांची खेळी केली. त्यास आदित्य शिंदे याने २१, आकाश गाडेकर याने १५ व मंथन पाटील याने १४ धावा केल्या. मोगणे सहाराच्या ओंकार मोहिते, भरत पुरोहित, श्रीराज चव्हाण, स्मित पाटील, राजवर्धन पाटील, अल्केश कवाळे यांच्या भेदक गोलंदाजीपुढे फायटर्सच्या संघाचा टिकाव लागला नाही. त्यामुळे हा सामना मोगणे सहारा संघाने सामन्यांसह विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेचा बक्षीस समारंभ राजाराम कॉलेजचे प्राचार्य अण्णासाहेब खेमनर यांच्या हस्ते व केडीसीएचे माजी अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी प्रा. संजय पठारे, केडीसीएचे अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, सचिव केदार गयावळ, अभिजित भोसले, जनार्दन यादव, कृष्णा धोत्रे, नितीन पाटील, शशिकांत मोगणे, विशाल कल्याणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : १३०२२०२१-कोल-क्रिकेट
ओळी : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कॅप्टन दीपक शिंदे ‘अ’ गट क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविलेल्या अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस् अकॅडमी ‘अ’ संघास प्राचार्य अण्णासाहेब खेमनर यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला. ///////////////////याव्बाळ पाटणकर///////////////////////// यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.