चोरट्याकडून चाळीस तोळे दागिने हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 01:06 AM2018-11-20T01:06:12+5:302018-11-20T01:06:19+5:30

कोल्हापूर : शहरात पहाटे घरफोड्यांचा धुमाकूळ घालणारा अट्टल चोरटा रसूल अन्वर सय्यद (वय २७, रा. सदर बाजार) याने ३४ ...

Capture forty tola jewelry from the thieves | चोरट्याकडून चाळीस तोळे दागिने हस्तगत

चोरट्याकडून चाळीस तोळे दागिने हस्तगत

googlenewsNext

कोल्हापूर : शहरात पहाटे घरफोड्यांचा धुमाकूळ घालणारा अट्टल चोरटा रसूल अन्वर सय्यद (वय २७, रा. सदर बाजार) याने ३४ घरफोड्यांची कबुली दिली आहे.
त्याच्याकडून ४० तोळे दागिने हस्तगत केल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. अमृतकर यांनी सांगितले, शहरातील वाढत्या घरफोड्या रोखणे आणि उघडकीस आणणे हे पोलिसांसाठी आव्हान होते.शाहूपुरीचे पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत घोलप आणि विजय इंगळे हे पेट्रोलिंग करताना रेकॉर्डवरील सराईत चोरटा रसूल सय्यद हा पळून जाऊ लागला. पाठलाग करून त्याला या दोघांनी पकडले. त्याच्याजवळ दागिने व मोबाईल मिळाला. चौकशीमध्ये १३ नोव्हेंबरला पहाटे चारच्या सुमारास अयोध्या कॉलनी कदमवाडी येथील घराचा दरवाजा उघडा दिसल्याचा पाहून त्या ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस कोठडीत त्याने सदर बाजार, ताराबाई पार्क, रमणमळा येथे महिन्याभरात बारा घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी ४० तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, साडेचार हजार रुपये जप्त केले. संशयित सय्यदने चोरीचे दागिने गुजरीतील काही सराफांना पत्नी व मित्रांच्या मध्यस्थीने विकले होते. त्यानुसार पोलिसांनी सहा सराफांना साक्षीदार करून त्यांच्याकडून दागिने हस्तगत केले. संशयित सय्यद हा बालगुन्हेगार होता. चोरी आणि घरफोडीमध्ये हातखंडा आहे. त्याने पोलिसांच्या तपासाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला आहे; त्यामुळे सहजासहजी तो मिळून येत नसे. त्याने गेल्या नऊ वर्षांमध्ये ३४ घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. सेट्रिंग काम करत तो पहाटे रेकी करून चोरी करतो.
----------------
यांचे मिळणार दागिने
रिया धनंजय दामुगडे (रा. गणेश पार्क, कदमवाडी), प्रताप राजाराम नाईक (रा. पाचगाव), डॉ. स्मिता हिरालाल चोपडे (रा. कोल्हापूर), सौरभ उमेश पाटील, अनुराधा चंद्रकांत भोसले, संतोष कृष्णात भारमल, राहुल भिकाजी बोडके, शंकर भागोजी वरक, महादेव गुंडू भोसले,(सर्व रा. कदमवाडी), लक्ष्मण हरी पाटील (रा. ताराबाई पार्क), आनंदा राजाराम कांबळे (निंबाळकर कॉलनी, कोल्हापूर), अभिजित गणपतराव पाटील-आंदळकर (रमणमळा).

Web Title: Capture forty tola jewelry from the thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.