Kolhapur: उदगाव पुलावरुन कार कोसळली; ‘एअरबॅग’ उघडली, अन् जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 15:50 IST2024-01-08T15:49:14+5:302024-01-08T15:50:21+5:30
अपघातात चालकासह तिघेजण जखमी

Kolhapur: उदगाव पुलावरुन कार कोसळली; ‘एअरबॅग’ उघडली, अन् जीवितहानी टळली
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदी पुलावरून सांगलीकडे जाणाऱ्या चार चाकी वाहनाचा ताबा सुटून पुलावरून खाली कोसळली. यामध्ये वाहनातील दोघेजण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना रविवारी घडली.
अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. तात्काळ पोलिसांनी वाहन क्रेनच्या साह्याने बाहेर काढले. अपघातानंतर सांगली कोल्हापूर महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगाव येथील कृष्णा नदी पुलावरून सांगलीकडे जाणारा वाहन चालकाचा ताबा सुटल्याने संरक्षक पाईपला धडकून खोल खड्डयात कोसळली. सुदैवाने गाडीतील एअर बॅग उघडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात चालकासह तिघेजण जखमी झाले असून खिडकीचा काच फोडून नागरिकांनी जखमींना गाडीतून बाहेर काढले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून झालेला वाहन क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावर काही काळ वाहतुक कोंडी झाली होती.
एअरबॅगमुळे जीव वाचला
वाहन चालकाचा ताबा सुटल्याने संरक्षक पाईपला धडकून कार खोल खड्डयात कोसळली. सुदैवाने गाडीतील एअर बॅग उघडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. चालकासह तिघेजण जखमी झाले असून खिडकीचा काचा फोडून नागरिकांनी त्यांना बाहेर काढले.