Kolhapur: यड्राव येथे चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली; महिला ठार, दहाजण जखमी  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 05:15 PM2024-05-13T17:15:01+5:302024-05-13T17:16:09+5:30

घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली

Car overturns after driver loses control at Yadrav Kolhapur; Woman killed, ten injured | Kolhapur: यड्राव येथे चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली; महिला ठार, दहाजण जखमी  

Kolhapur: यड्राव येथे चालकाचा ताबा सुटल्याने कार उलटली; महिला ठार, दहाजण जखमी  

यड्राव :  यड्राव (ता. शिरोळ) येथे चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एक महिला ठार झाली. लालबी कलबुर्गी (रा. संगमनगर तारदाळ) असे मृत महिलेचे नाव आहे. तर दहाजण जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना आज, सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील संगम नगर मधील सनदी परिवारातील हे सदस्य आहेत. रुग्णवाहिकेतून इचलकरंजी इथे आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.  

तारदाळ येथील सनदी कुटुंबीय नांदणी येथील नातेवाईकांकडे जात होते. नाईक-निंबाळकर सेवा सोसायटी समोरील ओढ्याजवळ चारचाकी वाहनचालकाचा दुसºया वाहनाला चुकविताना वाहनावरील ताबा सुटला. यामुळे चारचाकी वाहन उलटून रस्त्याकडेच्या ओघळीमध्ये जाऊन पडले. या भीषण अपघातामुळे मोठा आवाज झाला. यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. लालबी या गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार महिलांना मोठी दुखापत झाली आहे. तर यामध्ये पाच मुलेही जखमी झाली आहेत. 

जखमींना रुग्णवाहिकेतून सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शहापूर पोलिस तब्बल पाऊण तासानंतर घटनास्थळी दाखल झाल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत होता. पोलिसांनी पंचनाम्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात पाठविला. यावेळी मृतदेह व जखमींना पाहून नातेवाईकांसह अनेकांनी हंबरडा फोडला. सनदी कुटुंबीय हे पूर्वी रेणुकानगर यड्राव येथे राहत असल्यामुळे या परिसरातील अनेक नागरिक त्यांना ओळखत होते.  या घटनेमुळे उपस्थित नागरिकातून हळहळ व्यक्त होत होती.

Web Title: Car overturns after driver loses control at Yadrav Kolhapur; Woman killed, ten injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.