आमदार जाधव यांच्याकडून पालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 07:53 PM2021-05-21T19:53:11+5:302021-05-21T19:54:49+5:30

corona virus Kolhapur: कोल्हापूर महानगरपालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका घेण्याकरिता आमदार चंद्रकांत जाधव यांनी २३ लाख रूपयांचा निधी शुक्रवारी दिला. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत, निधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आमदार जाधव यांनी सूपूर्द केले.

Cardiac ambulance from MLA Jadhav to the municipality | आमदार जाधव यांच्याकडून पालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका

कोल्हापूर महानगरपालिकेस कार्डियाक रुग्णवाहिकेसाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी २३ लाख रूपयांच्या निधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे शुक्रवारी दिले. यावेळी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देआमदार जाधव यांच्याकडून पालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका २३ लाखाचा निधी : राजीव गांधीं स्मृतिदिनाचे औचित्य

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेला कार्डियाक रुग्णवाहिका घेण्याकरिता आमदार चंद्रकांत जाधव यांनी २३ लाख रूपयांचा निधी शुक्रवारी दिला. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधत, निधीचे पत्र जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे आमदार जाधव यांनी सूपूर्द केले.

यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आदी उपस्थित होते.
राज्य शासनाने खास बाब स्थानिक विकास निधीतून कोरोनाच्या प्रतिबंधात्मक यंत्रसामुग्री व साहित्य करिता एक कोटी रूपये खर्च करण्यास सहमती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार जाधव यांनी छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयासाठी (सीपीआर) वैद्यकिय यंत्रसामग्री व साहित्यासाठी ४० लाख ५० हजार रुपयांचा निधी दिला आहे, तर शुक्रवारी कोल्हापूर महानगरपालिकेला ३६ लाख रुपयांचा निधी दिला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या गंभीर रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी व्हेंटिलेटर व ऑक्सिजन आदी अद्ययावत सुविधा असलेली 'कार्डियाक' रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक असते. मात्र कोल्हापूर महानगरपालिकेकडे अशी एकही रुग्णवाहिका नाही. त्यामुळे अशा रूग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात नेताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे कार्डियाक रुग्णवाहिका महानगरपालिकेकडे असावी, असा मानस आमदार जाधव यांनी व्यक्त केला होता.
 

Web Title: Cardiac ambulance from MLA Jadhav to the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.