मालवाहतुकीच्या गाड्यांचे पासिंग ‘ट्रॅक’वर आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 06:37 PM2017-11-03T18:37:39+5:302017-11-03T18:40:31+5:30
कोल्हापूर : गेले काही दिवस बंद असलेल्या मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचे पासिंग अखेर हुपरी रोडवरील आर. एम. मोहिते यांच्या ‘गो-कार्टिंग’च्या ट्रॅकवर शुक्रवारपासून सुरळीत सुरू झाले.
कोल्हापूर : गेले काही दिवस बंद असलेल्या मालवाहतूक व प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचे पासिंग अखेर हुपरी रोडवरील आर. एम. मोहिते यांच्या ‘गो-कार्टिंग’च्या ट्रॅकवर शुक्रवारपासून सुरळीत सुरू झाले. दिवसभरात २५ हून अधिक मालवाहतूक व प्रवासी वाहतूक करणाºया वाहनांचे पासिंग न्यायालयाच्या निर्देशानुसार करण्यात आले.
वाहनांची ब्रेक तपासणी व योग्यता प्रमाणपत्र शासकीय मालकीच्या जमिनीवरील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर घेणे उच्च न्यायालयाने प्रादेशिक परिवहन कार्यालयास बंधनकारक केले होते. त्यानुसार कार्यालयाने मोरेवाडी येथील गट क्रमांक ६६/१ या सरकारी जागेतील ब्रेक टेस्टसाठी काही एकर जागा मागितली होती. मात्र, सरकारने या जागेतील केवळ १५ गुंठे जागा कार्यालयास हस्तांतरित केली. केवळ १५ गुंठ्यांमध्ये वाहनांचे ब्रेक टेस्टिंग करता येत नव्हते; त्यामुळे अपुºया जागेमुळे कार्यालयापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, मुख्य सचिवांनी एका बैठकीत अतिरिक्त पाच एकर जागा आणखी देण्याचे निर्देश दिल्यानंतर या जागेत ब्रेक टेस्टिंगसाठी लागणाºया ट्रॅकचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार शुक्रवारी या ट्रॅकवर डांबरीकरण करण्यात आले आहे.
तात्पुरती सोय म्हणून हुपरी रोडवरील मोहितेज रेसिंगच्या गो-कार्टिंग ट्रॅकवर या ब्रेक टेस्टिंगची सोय करण्यात आली आहे. यात या ट्रॅकवरील चाचणी मालवाहनधारकांना ऐच्छिक केली आहे; तर कºहाड येथेही अशीच सोय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात केली आहे. त्यात जवळील ठिकाण म्हणून मोहितेज रेसिंगवर शुक्रवारी २५ हून अधिक मालवाहतूक व प्रवासी वाहनांचे पासिंग पूर्ण करण्यात आले; तर आज, शनिवारी पूर्वनियोजित वेळेनुसार १२५ वाहनांचे पासिंग केले जाणार आहे. तसेच उद्या, रविवारी सुटी असूनही या ट्रॅकवर सुमारे ११० वाहनांचे पासिंग केले जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. डी. टी. पवार यांनी दिली. मोहितेज रेसिंगवरील पासिंग ट्रॅकचे समन्वयक म्हणून सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ए. के. पाटील, मोटारवाहन निरीक्षक प्रशांत साळी हे काम पाहत आहेत.