भरधाव ट्रकची ऊसतोडणी मजुरांच्या ट्रॅालीला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:25 AM2021-04-02T04:25:27+5:302021-04-02T04:25:27+5:30

कोल्हापूर : साखर कारखान्याचा हंगाम संपवून गावी परतणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या तांड्याच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. या ...

Cargo truck hits a labor trolley | भरधाव ट्रकची ऊसतोडणी मजुरांच्या ट्रॅालीला धडक

भरधाव ट्रकची ऊसतोडणी मजुरांच्या ट्रॅालीला धडक

googlenewsNext

कोल्हापूर : साखर कारखान्याचा हंगाम संपवून गावी परतणाऱ्या ऊस तोडणी मजुरांच्या तांड्याच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला भरधाव ट्रकने जोराची धडक दिली. या दुर्घटनेत एका ऊसतोडणी मजुराचा मृत्यू झाला. तर एकजण जखमी झाला. प्रकाश रामा वाघमारे (वय ३१ रा. सौदाणा, ता. पाटोदा, जि. बीड) असे मृताचे तर दीपक मनोहर पारखे (वय ३४ रा. सौदाणा) असे जखमीचे नाव आहे. ही दुर्घटना बुधवारी रात्री कागल ते मुरगुड रोडवर घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, ऊसतोडणी हंगाम संपवून सौदाणा येथील उस तोडणी मजुरांचा तांडा ट्रॅक्टर-ट्रॉलीतून सर्व साहित्यानिशी आपल्या गावी परतत होता. कागल ते मुरगुड रस्त्यावर भरधाव ट्रकने या ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोराची धडक दिली. या अपघातात ऊसतोडणी मजूर जखमी झाले. त्यापैकी प्रकाश वाघमारे यांना तातडीने सीपीआर रुग़्णालयात नेत असताना त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर दीपक पारखे ह्या जखमीवर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद सीपीआर पोलीस चौकीत झाली आहे.

Web Title: Cargo truck hits a labor trolley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.