ग्रामीण रुग्णालयाच्या हद्दीच्या वादातून मृतदेहाची हेळसांड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:20 AM2020-12-25T04:20:24+5:302020-12-25T04:20:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क धामोड-राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी येथील धोंडबा भिवा हळदे (वय ६२) हे सकाळी लघुपाटबंधारे प्रकल्पावरती सकाळी फिरण्यासाठी गेले ...

Caring for a corpse from a rural hospital boundary dispute | ग्रामीण रुग्णालयाच्या हद्दीच्या वादातून मृतदेहाची हेळसांड

ग्रामीण रुग्णालयाच्या हद्दीच्या वादातून मृतदेहाची हेळसांड

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

धामोड-राधानगरी तालुक्यातील खामकरवाडी येथील धोंडबा भिवा हळदे (वय ६२) हे सकाळी लघुपाटबंधारे प्रकल्पावरती सकाळी फिरण्यासाठी गेले असता पाय घसरून पाण्यात पडले. त्यांना उपचारासाठी सोळांकूर ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता वाटेतच त्यांचा मृत्यू झाला पण येथे या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याऐवजी हा मृतदेह आम्हाला ठरवून दिलेल्या गावातील नसल्याची आडमुठी भूमिका येथील वैद्यकीय अधिकाऱ्याने घेतल्याने हा मृतदेह चार तास ताटकळत ठेवला.

खामकरवाडी येथील धोंडबा भिवा हळदे हे गृहस्थ खामकरवाडी-अवचितवाडी दरम्यान असणाऱ्या लघुपाटबंधारे प्रकल्पावरती फिरण्यासाठी गेले असता पाय घसरून पाण्यात पडले. लोकांनी त्यांना पाण्याबाहेर काढत ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे पुढील उपचारासाठी पाठविले पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला असावा. दवाखान्यात पोहोचताच शवविच्छेदनासाठी नातेवाईकांनी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना विनंती केली पण राधानगरी ग्रामीण रुग्णालय व सोळांकूर ग्रामीण रुग्णालय यांच्या कामाच्‍या नियोजनाच्या वाटणीतून तालुक्याचे दोन भाग केल्याचा अघोषित करार पुढे आला. सकाळी सव्वानऊ वाजता सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात पोहोचलेल्या नातेवाईकांना शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात मिळवण्यासाठी दुपारचे अडीच वाजले.

फोटो ओळी= खामकरवाडी (ता. राधानगरी) येथील धोंडबा भिवा हळदे यांच्या मृतदेहाची वाट बघत बसलेले त्यांचे नातेवाईक व ग्रामस्थ.

२- मृत व्यक्ती

Web Title: Caring for a corpse from a rural hospital boundary dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.