जोतिबा यात्रेसाठी दहा मिनिटाला गाडी

By admin | Published: April 5, 2017 01:49 PM2017-04-05T13:49:24+5:302017-04-05T13:49:24+5:30

कोल्हापूर विभागाचे १५० गाड्या नियोजन

Carriage for ten minutes to Jotiba Yatra | जोतिबा यात्रेसाठी दहा मिनिटाला गाडी

जोतिबा यात्रेसाठी दहा मिनिटाला गाडी

Next

लोकमत आॅनलाईन

कोल्हापूर : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले श्री जोतिर्लिंग देवाच्या यात्रेनिमित्त राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने प्रत्येक दहा मिनिटाला एसटीचे नियोजन केले आहे. जोतिबा यात्रा काळात भाविकांच्या सोयीसाठी यंदा १५० बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

जोतिबा डोंगर (वाडीरत्नागिरी) येथे चैत्री पौर्णिमेनिमित्त श्री जोतिर्लिंग देवाची यात्रा सोमवार (दि. १०) रोजी होणार आहे. यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शहरातून दि. ८ व ११ एप्रिलपासून दर दहा मिनिटाला बसगाडीची सोय केली आहे. यासह पुणे, सातारा, सोलापूर या विभागाकडून थेट जोतिबा डोंगर येथे जाणाऱ्या व येणाऱ्या भाविकांसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. असे सहाय्यक वाहतूक अधिक्षक अतूल मोरे यांनी सांगितले.

यात्रा संपताच एकद्या प्रमुख गावी जाण्यासाठी भाविकांनी जादा गाडीची मागणी केले तर थेट संबधित गावा पर्यंत गाडी सोडण्याचे नियोजन महामंडळाने यंदा केले आहे. (प्रतिनिधी)


६५० कर्मचारी सेवेत....

यात्रेकाळात भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नयेसाठी एस.टी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी व प्रवाशी मित्र अशी ६५० जण दिवस - रात्र सेवेसाठी राहणार आहेत. या दरम्यान कोणतेही गाडीत बिघाड झाल्यास ती तात्काळ दुरुस्तीसाठी दोन पथके नेमण्यात आली आहेत. यासह सातारा येथून विशेष क्रेनही मागवली आहे.

येथून सुटणार गाड्या....

मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन, पंचगंगा घाट या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांना प्रत्येक दहा मिनिटाला बससेवा सुरू करण्यात आली आहे.

यात्रे दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी एसटीच्या सहज, सुलभसेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, तसेच जोतिबा यात्रेसाठी जोतिबा डोंगर व पंचगंगा नदी पंचगंगा घाट या ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्यावतीने प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे निवारे उभारण्यात येणार आहे.
डि.बी.कदम,
विभागीय वाहतूक अधिक्षक

Web Title: Carriage for ten minutes to Jotiba Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.