रक्तदान करून सामाजिक जबाबदारी पार पाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:19 AM2021-05-03T04:19:46+5:302021-05-03T04:19:46+5:30
खोची : कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगात रक्ताचा तुटवडा भासत आहे. याची दखल घेत सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून रक्तदान शिबिराचे ...
खोची : कोरोना महामारीच्या कठीण प्रसंगात रक्ताचा तुटवडा भासत आहे. याची दखल घेत सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करून संकटात मदत कारण्याचे कार्य उल्लेखनीय आहे. सर्वांनीच रक्तदान कार्यक्रमात सहभागी होऊन सामाजिक कार्य पार पाडावे, असे आवाहन वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी केले.
लाटवडे (ता. हातकणंगले) येथे नागरिक अधिकार सुरक्षा परिषद, राष्ट्रीय अपराध जाँच ब्युरो जिल्हा कमिटी, अर्पण ब्लड बँक व सोमनाथ उद्योग समूह यांच्या सयुंक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी होते. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १०६ जणांनी रक्तदान केले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक स्वाती सूर्यवंशी, रिटायर्ड मेजर राजेंद्र चौगुले, माजी पंचायत समिती सदस्या रूपाली माळी, शीतल माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
विविध विधायक उपक्रम राबवून सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर राहून काम करीत आलो आहोत. शासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत प्रशासनासही सहकार्य करण्याची परंपरा कायम ठेवली आहे, असे कृष्णात माळी यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पराग मुथा, विलास बोडके,
जिल्हा सदस्य ज्योती गाडेकर, सुप्रीमकुमार गाडेकर, शाईन शेख, इस्माईल जमादार आणि नागरिक अधिकार सुरक्षा परिषद सदस्य अमोल पल्लखे, श्रुतिका माळी, सुभाष पाटील, आकाश साळुंखे, बलराज पाटील, आशिष येवले, विजय चौगुले, मंजिरी धोंगडे, संतोष जाधव, अमर पंडित पाटील, सामाजिक कार्यकर्ते मंजूनाथ कोपर्डे, गुरुप्रसाद माळी, दिलीप पोवार, इक्बाल मुल्ला, सावंता माळी, संजय धोंगडे आदी उपस्थित होते.
फोटो ओळी-
लाटवडे येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृष्णात माळी, पराग मुथा, ज्योती गाडेकर, अमोल पल्लखे आदींची उपस्थिती होती.(छाया : आयुब मुल्ला)