मारहाणप्रकरणी तरुणास विसाव्या वर्षी पाच वर्षे सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:32 AM2021-02-27T04:32:04+5:302021-02-27T04:32:04+5:30
कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथे किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कोयत्याने हल्ला केल्याचा गुन्हा सिध्द झाल्याने निखिल कुशकुमार इंडी ...
कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथे किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर कोयत्याने हल्ला केल्याचा गुन्हा सिध्द झाल्याने निखिल कुशकुमार इंडी (वय २०) यास जिल्हा व सत्रन्यायाधीश बी. डी. शेळके यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. याच प्रकरणातील दुसरा आरोपी कुणाल इंडी यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. सरकारी वकील ॲड. समीर तांबेकर यांनी खटल्याचे काम पाहिले.
उचगाव (ता. करवीर) येथे ८ मार्च २०१३ रोजी विकास सुरेश सुतार याच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी निखिल, त्याचा भाऊ कुणाल, आई माधवी या तिघांवर गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन पोलीस अधिकारी विलास तुपे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जखमी व साक्षीदार यांची साक्ष यात महत्त्वाची ठरली. सरकारी वकिलांचा युक्तिवाद व समोर आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायाधीश शेळके यांनी निखिल इंडी याला पाच वर्षे, तर कुणाल यास तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आई माधवी यांची निर्दोष मुक्तता केली.