पूरस्थितीत आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवा, सतेज पाटील यांनी दिले निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 05:15 PM2021-07-10T17:15:27+5:302021-07-10T17:16:56+5:30

Flood Metting Kolhapur : हवामान विभागाने यंदा 110 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या संभाव्य पावसाचा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा अंदाज लक्षात घेवून प्रशासनाने सर्व आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

In case of emergency, keep the emergency system ready - instructions given by Satej Patil | पूरस्थितीत आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवा, सतेज पाटील यांनी दिले निर्देश

पूरस्थितीत आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवा, सतेज पाटील यांनी दिले निर्देश

googlenewsNext
ठळक मुद्देपूरस्थितीत आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवा सतेज पाटील यांनी दिले निर्देश

कोल्हापूर : हवामान विभागाने यंदा 110 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पडणाऱ्या संभाव्य पावसाचा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा अंदाज लक्षात घेवून प्रशासनाने सर्व आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी छत्रपती शाहूजी सभागृहात संभाव्य पूरस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी  पालकमंत्री म्हणाले, पूरस्थितीचा फटका ज्या गावांना सर्वाधिक बसला आहे अशा गावांची संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष पाहणी करावी. तसेच जी गावे स्थलांतरीत करावी लागतात अशा गावांवर लक्ष केंद्रीत करुन तेथील नागरिकांची गैरसोय होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, बोटी सज्ज ठेवाव्यात. त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारणीसाठी प्रशासनाने जागा शोधावी.

 ही जागा शोधत असताना दुर्गम तालुक्यांना प्राधान्य देण्यात यावे. आपत्तीसाठी लागणारे मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात यावे, अशी सूचना त्यांनी केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी पूरस्थितीचा सामना करावा लागणाऱ्या गावांचा आढावा प्रशासनाने घेतला असल्याची माहिती या बैठकीत दिली.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: In case of emergency, keep the emergency system ready - instructions given by Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.