नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख, एकास बेदम मारहाण; गोकुळच्या संचालकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 01:42 PM2022-01-12T13:42:26+5:302022-01-12T13:43:18+5:30

फिर्यादी कांबळे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ‘तुला गावात राहू देणार नाही’ अशी धमकी दिली, असा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे.

A case has been registered against Gokul director Bayaji Shelke and six others at Gaganbabada police station | नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख, एकास बेदम मारहाण; गोकुळच्या संचालकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख, एकास बेदम मारहाण; गोकुळच्या संचालकासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Next

गगनबावडा : कोरोना सक्तीच्या लसीकरणा विरोधात आंदोलनात भाषण करताना नेत्यांचा एकेरी शब्दात उल्लेख केल्याचा जाब विचारत  बहुजन मुक्ती पार्टीच्या गगनबावडा तालुकाध्यक्ष यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी गोकुळच्या संचालकांसह सहा जणांविरोधात गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

गोकुळचे संचालक बयाजी शेळके (रा.वेसरफ), सहदेव कांबळे, तुकाराम पाटील (दोघे रा. कोदे), शिवाजी राऊत (रा. निवडे), निलेश म्हाळुंगेकर (रा. निवडे), सूर्यकांत पडवळ (रा. मांडुकली पैकी खोपडेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणदूर ता. गगनबावडा येथील ज्ञानदेव बापू कांबळे (वय ४०) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यातील संशयितांनी ज्ञानदेव कांबळे यांना बोलेरो मध्ये बसवून साळवण येथील अरविंद खाटीक यांच्या दुकानासमोर आणले. दुकानात गोकुळचे संचालक बयाजी शेळके होते. शेळके यांनी मोबाईलमध्ये फिर्यादीने कोरोना लसीच्या सक्तीविरोधात कलेक्टर ऑफिस समोर केलेल्या आंदोलनातील भाषणाचा व्हिडिओ ज्ञानदेव कांबळे यांना दाखवला. 

फिर्यादी कांबळे यांनी एका नेत्याचा एकेरी उल्लेख केला होता. नेत्याचा एकेरी उल्लेख का केला? असा जाब विचारत संशयित सहदेव कांबळे याने फिर्यादीला  मारहाण केली. त्यानंतर शेळके, पडवळ, पाटील, राऊत, म्हाळुंगेकर या संशयितांनी फिर्यादी कांबळे यांना लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ‘तुला गावात राहू देणार नाही’ अशी धमकी दिली, असा दावा फिर्यादीकडून करण्यात आला आहे.

Web Title: A case has been registered against Gokul director Bayaji Shelke and six others at Gaganbabada police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.