गैरव्यवहारप्रकरणी वन अधिकाºयांसह तिघांची वेतन वाढ कायमस्वरुपी रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:27 AM2017-09-23T00:27:24+5:302017-09-23T00:27:24+5:30

In the case of mismanagement, the wages of the three officers, including the forest officials, have been postponed permanently | गैरव्यवहारप्रकरणी वन अधिकाºयांसह तिघांची वेतन वाढ कायमस्वरुपी रोखली

गैरव्यवहारप्रकरणी वन अधिकाºयांसह तिघांची वेतन वाढ कायमस्वरुपी रोखली

Next
ठळक मुद्देआपलं सरकार ' पोर्टलवरील तक्रारीची दोन वर्षांनी दखल

बाजारभोगाव : पडसाळी व गोठणे (ता. पन्हाळा) येथे वन व्यवस्थापन समितींतर्गत बांधलेल्या सामाजिक सभागृह कामाच्या गैरव्यवहार प्रकरणी मानवाड (ता. पन्हाळा) येथील तत्कालीन परिमंडल वन अधिकारी व दोन वनरक्षक अशा तिघांची वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्यासह ४२ हजार १४६ रुपयांच्या तफावतीची रक्कम वसूलीचे घेण्याचे आदेश उपवनसंरक्षक प्रभुनाथ शुक्ला यांनी दिले आहेत.

याबाबतचे लेखी आदेश तक्रारदार रामचंद्र बाबू करले ( रा. पिसात्री , ता. पन्हाळा) यांना प्राप्त झाले आहेत. कारवाई झालेल्यांत मानवाडचे तत्कालीन परिमंडल वन अधिकारी विनायक कदम , वनरक्षक पी. बी. कोळी व सौ. सं . अ. बोभाटे यांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पडसाळी व गोठणे येथे संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत सामाजिक सभागृह बांधकाम झाले होते. 'आपलं सरकार ' या शासनाच्या वेब पोर्टलवर २८ आॅक्टोबर २०१५ रोजी सदरचे काम निकृष्ट झाल्याची तक्रार श्री. करले यांनी नोंदवली होती. त्याबाबत विभागीय वनाधिकारी श्री. भोसले व उपवन अभियंता यांनी पाहणी करुन सादर केलेल्या सविस्तर अहवालात कामात अनेक गंभीर त्रूटी आढळल्याचे नमूद केले होते.

पडसाळी व गोठणे येथे संयुक्त वनव्यवस्थापन समिती अंतर्गत बांधलेल्या सामाजिक सभागृहासाठी तीन नव्या भिंती बांधून शेजारच्या इमारतीची एक जुनी भिंत वापरुन खर्च वाचवला आहे. अंदाजपत्रकाकडे डोळेझाक करुन मनमानी करत सागाच्या चौकट- दरवाज्याऐवजी सिंमेंटची चौकट व पत्र्याचा दरवाजा बसवला आहे. स्टीलऐवजी सिंमेटची खिडकी वापरली आहे. गिलाव्यासह रंगकामही निकृष्ट केले आहे. छतासाठी गॅल्वनाईज पत्र्याऐवजी अ‍ॅसबेस्टॉस सिंमेटचा पत्रा वापरला आहे. प्रत्यक्ष नियोजन व अंदाजपत्रकाप्रमाणे काम न झाल्याने मोजमाप पुस्तकातील खोल्यांचे व प्रत्यक्ष इमारतीचे आकारमान यात खूप तफावत आहे.

झालेल्या कामांच्या बाबवार मोजमापांची वस्तुस्थितीदर्शक नोंद नाही. अंदाजपत्रकातील गोषवाºयाप्रमाणे बिले आदा केली आहेत. कामाचे मूल्यांकन व खर्च रक्कम यात पडसाळी व गोठणेच्या कामात रक्कम ४२ हजार १४६ रूपयांची विसंगती आहे. मोजमाप पुस्तिकेवर सहाय्यक वन संरक्षक व उपवनसंरक्षक यांनी तपासणीचा शेरा दिलेला नाही.या
या प्रकरणाची रीतसर चौकशी होवूनही तत्कालीन उपवनसंरक्षक रंगनाथा नाईकड़े यांच्या दुर्लक्षामुळे याबाबत दोन वर्षे कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. तथापि, तक्रारदार श्री. करले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रभुनाथ शुक्ल यांनी दोषी कर्मचाºयांवर प्रत्येकी एक वार्षिक वेतनवाढ कायमस्वरुपी रोखण्याची कारवाई केली.

तफावत आढळलेल्या ४२ हजार १४६ रुपयांपैकी वनपाल विनायक कदम यांचेकडून ३१ हजार ६१० रुपए तर वनरक्षक पी. बी. कोळींकडून ६ हजार ८१२ रुपए तत्काळ वसुलीचे आदेश श्री. शुक्ला यांनी दिले आहेत. वनरक्षक सौ.सं. अ. बोभाटे यांनी ३ हजार ७२४ रुपए जमा केले आहेत. दरम्यान , तक्रारदार श्री.करले यांनी दोषी अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्य वनसंरक्षक अरविंद पाटील यांना दिले आहे.

 

Web Title: In the case of mismanagement, the wages of the three officers, including the forest officials, have been postponed permanently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.