अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:17 AM2021-07-08T04:17:21+5:302021-07-08T04:17:21+5:30

याबाबत अधिक माहिती अशी, माहे फेब्रुवारी २०२१ मध्ये सकाळी दहाच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी (वय १६ वर्षे १० महिने) ...

A case of molestation of a minor girl | अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

Next

याबाबत अधिक माहिती अशी, माहे फेब्रुवारी २०२१ मध्ये सकाळी दहाच्या सुमारास पीडित अल्पवयीन मुलगी (वय १६ वर्षे १० महिने) ही तिच्या घरी असताना घरात कोणी नसल्याचे पाहून आरोपी ज्योतीराम आप्पाजी डोणे याने विनयभंग केला. ही घटना कोणाला सांगितलीस तर तुझ्या आई-वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतरही आरोपी हा मोटारसायकलवरून पीडित मुलीच्या पाठीमागे जायचा, मोटारसायकल रेस करून टाळ्या वाजवून पीडित मुलीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करायचा. हा प्रकार पीडित मुलीच्या भावास समजल्यानंतर बुधवार (दि. ०९) जून रोजी आरोपीस जाब विचारायला गेल्यावर आरोपी याने तिच्या भावाला लाकडी दांडक्याने मारण्यासाठी अंगावर धावून जाऊन तू कोण मला विचारणार, असे म्हणून शिवीगाळ केली. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने आज बुधवारी (दि. ७) जुलै रोजी तिच्या वडिलांसोबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संशयित आरोपी ज्योतीराम आप्पाजी डोणे याला तत्काळ अटक करण्यात आली आहे.

Web Title: A case of molestation of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.