डॉक्टर युवतीशी जवळीक करुन केला विनयभंग, टि.व्ही. मालिकेतील कलाकारास कोल्हापुरात अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 01:45 PM2022-02-12T13:45:29+5:302022-02-12T13:46:15+5:30

दूरचित्रवाणीवरील एका प्रसिद्ध चित्रमालिकेत काम करीत आहे

case of molestation Actor of the series arrested in Kolhapur | डॉक्टर युवतीशी जवळीक करुन केला विनयभंग, टि.व्ही. मालिकेतील कलाकारास कोल्हापुरात अटक

डॉक्टर युवतीशी जवळीक करुन केला विनयभंग, टि.व्ही. मालिकेतील कलाकारास कोल्हापुरात अटक

Next

कोल्हापूर : ‘शादी डॉट कॉम’ या वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर डॉक्टर युवतीशी लगट वाढवून तिचा विनयभंग करणाऱ्या टि. व्ही. मालिकेतील कलाकारास राजारामपूरी पोलिसांनी आज, शनिवारी पहाटे अटक केली. जितेंद्र शेलाजी पोळ (वय ३२ रा. कात्यायणी कॉप्लेक्स, कळंबा, कोल्हापूर) असे अटक केलेल्या कलाकाराचे नाव आहे. तो सद्या दूरचित्रवाणीवरील एका प्रसिद्ध चित्रमालिकेत काम करीत आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पिडीत युवती ही पेशाने डॉक्टर आहे. संशयित जितेंद्र पोळ व तिची ‘शादी डॉट कॉम’ या वेबसाईटवर ओळख झाली. ओळखीनंतर त्याने पीडित तरुणीशी लगट वाढविण्याचा प्रयत्न केला. तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पीडित तरुणी ज्या ठिकाणी काम करते त्या ठिकाणी जाऊन तिच्याशी मला तुझ्याशी काही बोलायचे आहे असे सांगून सतत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

युवतीने लग्नाच्या प्रस्तावाला वारंवार नकार दिला. तरीही संशयिताने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या त्रासाला कंटाळलेल्या युवतीने नातेवाईकाकडे तक्रार करून थेट पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. याप्रकरणी शनिवारी मध्यरात्री संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असे पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले. पोलीस चौकशीमध्ये संबंधित तरुण दूरचित्रवाणीवरील एका प्रसिद्ध चित्रमालिकेत काम करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे असेही ओमासे यांनी सांगितले.

Web Title: case of molestation Actor of the series arrested in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.