‘अथर्व-दौलत’ कारखाना दगडफेकप्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखल, अध्यक्ष खोराटे म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 11:30 AM2022-10-26T11:30:51+5:302022-10-26T11:31:11+5:30

शेतकऱ्यांनीच मला सांगावे की, मी काय करावे, असा सवालच ‘अथर्व-दौलत’चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी उपस्थित केला

Case registered against 16 people in case of Atharva-Daulat factory stone pelting | ‘अथर्व-दौलत’ कारखाना दगडफेकप्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखल, अध्यक्ष खोराटे म्हणाले..

‘अथर्व-दौलत’ कारखाना दगडफेकप्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखल, अध्यक्ष खोराटे म्हणाले..

Next

चंदगड : उपद्व्यापी कामगारांमुळे माझ्या अनेक कामगार व अधिकाऱ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळे त्या कामगारांना घेऊन मला कारखाना सुरू करणे अशक्य आहे. शेतकऱ्यांनीच मला सांगावे की, मी काय करावे, असा सवालच ‘अथर्व-दौलत’चे अध्यक्ष मानसिंग खोराटे यांनी उपस्थित केला. मंगळवारी हलकर्णी येथे अथर्व-दौलत कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बोनसच्या मागणीकडे दुर्लक्ष करत शिफ्टमध्ये कामावर बोलवून जनरल शिफ्टमध्ये कामावर आलेल्या कामगारांना आत न घेतल्याच्या रागातून आतील कामगारांना मारहाण करून दौलतच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे ते निवळले. मात्र, अशा वातावरणात आतील कामगारांचा जीव टांगणीला लावून मला कारखाना चालविणे अशक्य आहे. त्यामुळे त्या ७० कामगारांना वगळून इतर कामगारांना घेऊन मी लवकरात लवकर काम पूर्ण करून कारखाना सुरू करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मात्र, त्या ७० कामगारांसाठी इतर कामगारांनी मला सहकार्य केले नाही तर कारखाना सुरू करणे शक्यच नाही.

विशिष्ट हेतूनेच हल्ला

बोनसविषयी कामगारांनी माझ्याशी बोलणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांना वेळसुद्धा दिली होती. मात्र, ते आले नाहीत. उलट, कामावर असलेल्या कामगारांना मारहाण केली. त्यामुळे सोमवारचा हल्ला हा विशिष्ट हेतूनेच केला होता. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखेच त्यांचे कृत्य होते.

दगडफेकप्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखल

दगडफेकप्रकरणी कामगार पी. डी. सरवदे यांच्या फिर्यादीवरुन मंगळवारी (१६) जणांवर विविध कलमांन्वये चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महादेव आप्पा फाटक (रा. फाटकवाडी), अशोक गावडे (रा. डुक्करवाडी), अशोक चांदेकर, मल्लाप्पा केसरकर, संजय विठ्ठल देसाई, रामलिंग मऱ्याप्पा पाटील, निवृत्ती राजाराम पाटील, झेलू गावडे, दत्तात्रय मोहिते, सुधाकर पवार, उत्तम निचम, महांतेश कणगली, संजय तुकाराम हजगोळकर, सहदेव पाटील, सुरेश पाटील, केदारी पाटील व इतर २०० ते २५० कामगारांच्या विविध कलमांन्वये चंदगड पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Case registered against 16 people in case of Atharva-Daulat factory stone pelting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.