माती उत्खननप्रकरणी महसूल विभाग खडबडून जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:26 AM2021-09-27T04:26:36+5:302021-09-27T04:26:36+5:30
शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीकाठालगत असलेल्या शेडशाळ, शिरटी, कनवाड, कुटवाड, बस्तवाड, आलास, औरवाड, बुबनाळसह कर्नाटक हद्दीपर्यंत वीटभट्टीसाठी बेकायदेशीर वाळू उत्खनन ...
शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीकाठालगत असलेल्या शेडशाळ, शिरटी, कनवाड, कुटवाड, बस्तवाड, आलास, औरवाड, बुबनाळसह कर्नाटक हद्दीपर्यंत वीटभट्टीसाठी बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरू आहे. तहसीलदारांनी परवानगी दिलेल्या जागेत १५ ते २० फूट उत्खनन केले जात आहे. कृष्णा काठालगतच हे सुरू असल्याने नदीचे पात्र रुंद होऊन आजूबाजूच्या शेतीचे नुकसान होत आहे, तरीही याकडे महसूल प्रशासन काणाडोळा करीत आहे. शिरोळ तालुक्यातील मातीही सांगली जिल्ह्यातील वीटभट्टीसाठी जात आहे. याबाबत लोकमतमधून वृत्त प्रकाशित होताच रविवारीच महसूल प्रशासन जागे झाले आहे.मध्यंतरी तहसीलदारांनी सातबारावर बोजा चढवून शेतकऱ्यांवर कारवाई केली होती. मात्र, माती व्यावसायिकांवर कोणतीच कारवाई झाली नाही.
---------------------------
शेतकऱ्यांना आर्थिक आमिष
कोरोना आणि महापुराच्या लागोपाठ संकटामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. याचाच फायदा घेत शेतकऱ्यांना आर्थिक आमिष दाखवून माती उत्खननासाठी तयार केले जात आहे.
कोट -
स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महसूल विभागाचे तलाठी, कोतवाल, मंडल अधिकारी यांची साखळी असल्यामुळे माती उत्खननाला बळ मिळत आहे. याबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी तहसीलदार यांनी वेळीच लक्ष घालून माती परवाना रोखावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल.
- विश्वास बालीघाटे, स्वाभिमानी शेतकरी संघटना
फोटो - २६०९२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - माती उत्खननामुळे कृष्णा नदीकाठालगत शेतामध्ये १५ ते २० फुटांचे खड्डे पडले आहेत.