निवृत्त लिपिकाची रोकडसह बॅग लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 10:56 AM2019-02-25T10:56:23+5:302019-02-25T10:57:15+5:30
पीरवाडी (ता. करवीर) येथील संकल्पसिद्धी मंगल कार्यालयात नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेल्या सेवानिवृत्त लिपिकाची बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. बॅगेमध्ये ३0 हजार रुपये, दोन सोन्याच्या अंगठ्या, बँकेची कागदपत्रके असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल होता. ही घटना शनिवारी (दि. २३) रोजी घडली.
कोल्हापूर : पीरवाडी (ता. करवीर) येथील संकल्पसिद्धी मंगल कार्यालयात नातेवाईकांच्या लग्नासाठी आलेल्या सेवानिवृत्त लिपिकाची बॅग चोरट्याने हातोहात लंपास केली. बॅगेमध्ये ३0 हजार रुपये, दोन सोन्याच्या अंगठ्या, बँकेची कागदपत्रके असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल होता. ही घटना शनिवारी (दि. २३) रोजी घडली.
अधिक माहिती अशी, मधुकर मारुती वाघमारे (वय ६६, रा. खंडोबा मंदिराजवळ, लक्ष्मीनगर, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) हे सहा वर्षांपूर्वी पुणे येथील शासनाच्या संरक्षण खात्यातून लिपिक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या नातेवाईकाचे लग्न पीरवाडी येथील हॉलमध्ये असल्याने ते पत्नी, दोन मुलांसोबत शनिवारी कोल्हापुरात आले होते.
लग्न समारंभ आटोपल्यानंतर ते जेवण विभागात गेले. ते जेवण करून हात धुण्यासाठी गेले. जाताना त्यांनी सोबतची बॅग खूर्चीवर ठेवली होती. परत येऊन पाहतात तर बॅग गायब होती. आजूबाजूला शोध घेतला; परंतु ती सापडली नाही.
याप्रकरणी त्यांनी करवीर पोलिसांत फिर्याद दिली. या सभागृहामध्ये सीसीटीव्ही नसल्याने लग्न समारंभात अनेकवेळा चोऱ्या घडल्या आहेत. पोलीस निरीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत.