कॉगे्रसमधील कलह चव्हाट्यावर

By admin | Published: January 4, 2017 11:38 PM2017-01-04T23:38:46+5:302017-01-04T23:38:46+5:30

हातकणंगले तालुका : कुरघोडीचे राजकारण; कॉग्रेसची विविध गटांत विभागणी

In the Causeway, | कॉगे्रसमधील कलह चव्हाट्यावर

कॉगे्रसमधील कलह चव्हाट्यावर

Next

दत्ता बिडकर-- हातकणंगले -आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वी हातकणंगले तालुक्यामध्ये काँग्रेस (आय) पक्षाची स्थिती नाजूक झाली आहे. पक्षाच्या तीन नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झालेमुळे नेत्यांच्या अंतर्गत कलहामुळे तालुका काँग्रेसची छकले होण्याची शक्यता असून, एकसंघ काँग्रेस निवडणुकीअगोदर विखुरली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हातकणंगले तालुका एकेकाळी काँग्रेस आय पक्षाचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, काँग्रेसच्या नेतेमंडळींमध्ये राज्य आणि देश पातळीवर वजन वाढविण्याच्या आणि हायकमांडची मर्जी सांभाळण्यासाठी तालुक्यातील माजी मंत्री जयवंतराव आवळे आणि प्रकाश आवाडे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली. त्यामध्ये जिल्ह्याचे नेतृत्व करणारे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची भर पडली. एकाच तालुक्यातील हे तीन नेते एकमेकांवर कुरघोडी चे राजकारण करून सत्ता गमावून बसले चे स्पष्ट आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याला काही दिवस बाकी असताना तालुक्यामध्ये पुन्हा एकदा काँग्रेस पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. याला नुकत्याच पार पडलेल्या इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीचे निकाल आणि पक्षाची उमेदवारी मिळवण्याचे राजकारण स्पष्ट आहे. माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि प्रत्येक प्रभागातील उमेदवार आपले विधानसभा क्षेत्र असल्यामुळे हायकमांडकडून ए, बी फार्मसह उमेदवारी मिळवली. यामुळे माजी खासदार आणि माजी मंत्री असलेल्या जयवंतराव आवळे यांची गोची झाली. काँग्रेस पक्षाची नगराध्यक्ष पदाची उमेदवारी आवळे यांचे पुत्र संजय आवळे यांना मिळविण्यासाठी प्रयत्न केले, मात्र अपयश आले.
हातकणंगले विधानसभा मतदारसंघ जयवंतराव आवळे यांचा हक्काचा मतदारसंघ असल्याने त्यांनी आपणच काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा असल्यानेच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे उमेदवार आपण ठरवू तेच असणार, असे काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात स्पष्ट केले आहे. यामुळे प्रकाश आवाडे गटाची गोची झाली आहे, तर माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची ताराराणी आघाडी जिल्हा परिषद मतदारसंघाची चाचपणी करत आहे.
माजी मंत्री प्रकाश आवाडे गटाकडून कबनूर, कोरोची या दोन इचलकरंजी विधानसभा मतदारसंघांतील आणि हुपरी, रेंदाळ, व पट्टणकोडोली या तीन हातकणंगले विधानसभा मतदारसंघांतील एकूण पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती मतदारसंघांमध्ये स्वतंत्र निवडणूक लढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पाच जिल्हा परिषद मतदारसंघात आवाडे गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना यांच्याबरोबर आवश्यकते- नुसार ज्या त्या जिल्हा परिषद मतदारसंघात आघाडीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे हे स्वत: तालुक्यातील एकमेव रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक तयारीला लागले आहेत. त्यांनाच काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीची शाश्वती नसल्याने आवाडे गटाने पाच जि. प. मतदारसंघांत आघाडीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

महाआघाडी सर्वच जागा लढविणार
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीचे शिरोली, रुकडी, कुंभोज आणि भादोले या जिल्हा परिषद मतदारसंघांत चांगले प्राबल्य आहे त्यांच्याकडून ही स्वाभिमानी शेतकरी संघटना, भाजप आणि इतर स्थानिक पातळीवरील गटाबरोबर महाआघाडीची रचना सुरू आहे. यामुळे तालुक्यामध्ये त्यांच्या महाआघाडीकडून सर्वच अकरा जिल्हा परिषद आणि २२ पंचायत समिती मतदारसंघांत उमेदवार निवडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

Web Title: In the Causeway,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.