CBSE 10th Result 2018 : दहावीत कोल्हापूरच्या शाळांचे घवघवीत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:06 PM2018-05-29T18:06:03+5:302018-05-29T18:06:03+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल मंगळवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापुरातील बहुतांश शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.
कोल्हापूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या (सीबीएसई) दहावीचा निकाल मंगळवारी दुपारी आॅनलाईन जाहीर झाला. कोल्हापुरातील बहुतांश शाळांचे निकाल शंभर टक्के लागले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात ‘सीबीएसई’ अभ्यासक्रमाच्या शाळांमधील दहावीची परीक्षा मार्चमध्ये झाली. त्याचा निकाल मंगळवारी ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर जाहीर झाला. संकेतस्थळावर परीक्षेचा बैठक क्रमांक, जन्मतारीख, परीक्षा केंद्र, शाळेचा सांकेतिक क्रमांक नोंदविल्यानंतर निकाल दिसत होता.
कोल्हापूर पब्लिक स्कूलमध्ये ‘सोहम घेवारी’ अव्वल
कोल्हापूर पब्लिक स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. सोहम घेवारी याने ९८ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकविला. समीक्षा कुलकर्णीने(९६.२ टक्के) द्वितीय, अनुष्का गोलवलकर व ईशा गाटे यांनी (९६ टक्के) तृतीय क्रमांक मिळविला. यातील सोहमने समाजशास्त्र व संस्कृत विषयात शंभर पैकी शंभर, इंग्रजीमध्ये ९७, विज्ञानमध्ये ९८ गुण मिळविले.
समीक्षा हिने विज्ञानमध्ये ९८, इंग्रजीत ९७ गुण, तर ईशाने संस्कृतमध्ये १००, इंग्रजीत ९७ गुण मिळविले. अन्वित दामले याने संस्कृतमध्ये शंभर, कैलास रोहिदास याने गणितमध्ये ९६ गुण, तेजल कुंभारने हिंदीमध्ये ९५ गुण मिळविले.
या शाळेतील वीस विद्यार्थी ९० टक्कयांहून अधिक गुणांनी, ४० विद्यार्थी हे विशेष उच्च श्रेणीमध्ये, तर अन्य विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्य उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना संस्थेचे अध्यक्ष किशोर तावडे, संस्थापिका शोभा तावडे, अंजली मेळवंकी आदींसह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
शांतीनिकेतन
डॉ.डी.वाय.पाटील, अकॅडमीचे शांतीनिकेतन स्कूलचा सीबीएसईचा दहावी निकाल यंदाही १०० टक्के लागला. १८१ विद्यार्थ्यापैकी दहा विद्यार्थी उच्च श्रेणीमध्ये (९५ -१०० टक्के), १६ विद्यार्थी मेरीटमध्ये (९१ -९५ टक्के) तर १०२ विद्यार्थी विशेष श्रेणीत (९० -७० टक्के) तसेच प्रथम श्रेणीत ३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यामध्ये अक्षयनी पवार (९७.४ टक्के), मयंक सिन्हा (९७.४ टक्के), रिध्दि निल्ले (९७.२ टक्के), ग्रीष्मा मेहता (९६.६ टक्के), प्रद्युम्न दानिगोंड (९५.४ टक्के). या सर्वांना संस्थेचे चेअरमन डॉ. संजय डी. पाटील, संचालिका राजश्री काकडे, प्राचार्या जयश्री जाधव, उपप्राचार्य मनिषा पाटील सर्व शिक्षक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.
विबग्योर ग्रुप आॅफ स्कूल
विबग्योर ग्रुप आॅफ स्कूलचा सीबीएसई दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये शाळेतील देवांशी अंकुर देढिया हिने ९५.६ टक्केसह शाळेत अव्वल ठरली. तसेच किरण तानाजी पाटील हिने ९४.६ टक्के, अभिषेक गोपाळ दरकने ९४.६ टक्के गुण मिळविले. त्यांना प्राचार्य टी. बालन यांचे मार्गदर्शन लाभले.