अपघातग्रस्त बेपत्ता मोटारीचा सीसी कॅमेरामुळे शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:22 AM2021-01-04T04:22:15+5:302021-01-04T04:22:15+5:30
कोल्हापूर : पंधरा दिवसांपूर्वी मोपेडस्वाराला पाठीमागून जोरदार धडक देत गंभीर जखमी करुन बेपत्ता झालेल्या कारचा सेफ सीटी योजनेतील सीसीटीव्ही ...
कोल्हापूर : पंधरा दिवसांपूर्वी मोपेडस्वाराला पाठीमागून जोरदार धडक देत गंभीर जखमी करुन बेपत्ता झालेल्या कारचा सेफ सीटी योजनेतील सीसीटीव्ही कॅमेराद्वारे शोध लागला आहे. त्यानुसार कारचालक प्रकाश जगन्नाथ निकम (वय ५२, रा. टिपुगडे गल्ली, कळंबा, ता. करवीर) याच्यावर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दिनांक १९ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता टाकाळा उड्डाणपुलावर भरधाव कारने एका मोपेडला पाठीमागून धडक दिली. या अपघातात शकुंतला विलास वाघमार (वय ५०, रा. उचगाव) ह्या मोपेडचालक जखमी झाल्या होत्या. मात्र, अपघातानंतर कारचालक न थांबताच पळून गेला. त्यानंतर सेफ सीटी योजनेतील उड्डाणपूल परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरेची तपासणी केली असता, अपघातग्रस्त कार ही संतोष विश्वनाथ पोवार (रा. बुध्दीहाळकर नगर, कळंबा रिंगरोड) यांच्या मालकीची असल्याचे उघड झाले. अपघातावेळी त्यांनी आपली कार मुलीच्या लग्नकार्यासाठी मित्र प्रकाश निकम यांना वापरण्यास दिल्याचे निष्पन्न झाले. त्यावेळी त्याच्याकडून हा अपघात घडल्यामुळे निकम यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.