सिंधुनगरीत सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:19 AM2020-12-25T04:19:31+5:302020-12-25T04:19:31+5:30
कोल्हापूर : माजी नगरसेविका माधुरी किरण नकाते यांनी प्रभागातील वेगवेगळ्या परिसराच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा गुरुवारी कार्यान्वित ...
कोल्हापूर : माजी नगरसेविका माधुरी किरण नकाते यांनी प्रभागातील वेगवेगळ्या परिसराच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा गुरुवारी कार्यान्वित केली.
सिंधुनगरी येथे बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन गुरुवारी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील व माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला भाजप-ताराराणी आघाडीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व भागातील नागरिकांनी गर्दी केली होती.
ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी बाकडी स्वरूपात बैठक व्यवस्था केली आहे. त्याचे लोकार्पणही केले. माजी नगरसेवक नकाते यांनी स्वखर्चातून प्रभागात ठिकठिकाणी सीसीटीव्ही १३ कॅमेरे कॅमेरे सिंधुनगरी परिसरात बसविले आहेत. दुसऱ्या टप्प्यात गजानन महाराज नगर, दत्तकॉलनी, ड्रायव्हर कॉलनी, पद्मा कॉलनी,समर्थ कॉलनी, शिवराय कॉलनी, तुळजाभवानी कॉलनी, सिंचन कॉलनी परिसरात ३२ कॅमेरे कार्यान्वित होत आहेत.
याप्रसंगी माजी महापौर सुनील कदम, सुहास लटोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी नगरसेवक अजित ठाणेकर, सराफ व्यापारी संघाचे कुलदीप गायकवाड, रमेश चावरे, महेश पन्हाळकर, अमर नकाते यांची उपस्थिती होती.
फोटो क्रमांक - २४१२२०२०-कोल-सीसीटीव्ही
ओळ - कोल्हापुरातील सिंधुनगरी येथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे अनावरण गुरुवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.