श्रीधर सावंत विद्यामंदिरमध्ये दोन दिवसांत सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:11 AM2021-02-05T07:11:15+5:302021-02-05T07:11:15+5:30
कोल्हापूर : रूईकर कॉलनीतील डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिरमध्ये शनिवारी (दि. ३०) आणि रविवारी (दि. ३१) सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. ...
कोल्हापूर : रूईकर कॉलनीतील डॉ. श्रीधर सावंत विद्यामंदिरमध्ये शनिवारी (दि. ३०) आणि रविवारी (दि. ३१) सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्याबाबतचे पत्र या विद्यामंदिरच्यावतीने जयभारत शिक्षण संस्थेचे खजानीस धैर्यशील जाधव यांनी महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या प्रशासनाधिकाऱ्यांना बुधवारी दिले आहे, अशी माहिती कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे निमंत्रक अशोक पोवार यांनी दिली.
या विद्यामंदिरमधील वर्गखोल्यांत १५ दिवसांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशी मागणी सर्व संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आली होती. मात्र, २२ दिवस झाले, तरी त्याबाबत कार्यवाही झाली नव्हती. त्यावर कृती समितीचे सदस्य, शिक्षण समितीच्या अधिकाऱ्यांनी शाळेला बुधवारी भेट दिली. त्यावर १ फेब्रुवारीपर्यंत सीसीटीव्ही बसविण्यात येतील, असे लेखी पत्र या संस्थेच्यावतीने देण्यात आले आहे, अशी माहिती पोवार यांनी दिली. यावेळी प्रशासनाधिकारी एस. के. यादव, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, भरत रसाळे आदी उपस्थित होते.