राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वर्धापन दिन साजरा, ध्वजारोहण, साधेपणाने साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 06:53 PM2021-06-10T18:53:34+5:302021-06-10T18:55:21+5:30
Ncp Kolhapur : कोल्हापूर येथील शिवाजी स्टेडियममधील शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात २२ वा वर्धापन दिन साधेपणाने पण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे विविध सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून फक्त ध्वजारोहण करण्यात आले. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते सकाळी १० वाजून १० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
कोल्हापूर : येथील शिवाजी स्टेडियममधील शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात २२ वा वर्धापन दिन साधेपणाने पण उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना महामारीमुळे विविध सार्वजनिक कार्यक्रम रद्द करून फक्त ध्वजारोहण करण्यात आले. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या हस्ते सकाळी १० वाजून १० वाजता ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी पोवार म्हणाले, गेली सतरा वर्षे मी कोल्हापूर शहरात पक्षाचे प्रतिनिधित्व करीत आहे. शहरात राष्ट्रवादी रुजवण्याचे काम प्रामाणिकपणे केले. आज मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पण इतर आरक्षण आहे तसेच ठेवून मराठा आरक्षण मिळावे, अशी आमची भूमिका आहे.
यावेळी शहराध्यक्ष पोवार यांच्या हस्ते केक कापण्याचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाचे स्वागत सरचिटणीस सुनील देसाई यांनी केले. कार्यक्रमास सुनील पाटील, महेंद्र चव्हाण, जहिदा मुजावर, रमेश पोवार, प्रसाद उगवे, लालासो जगताप, निरंजन कदम , रामराजे बदाले, रियाज कागदी, निशिकांत सरनाईक, महादेव पाटील, सुनील जाधव, नितीन पाटील, सलीम मुल्ला, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, सोहेल बागवान यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सुहास साळोखे यांनी आभार मानले.
दरम्यान, येथील मार्केट यार्डातील ग्रामीण राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सकाळी ठिक दहा वाजून १० मिनिटांनी जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून केक कापण्यात आला. जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी महिला जिल्हा उपाध्यक्षा स्वाती मोरे यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष पाटील यांच्या हस्ते जीवन संजीवनी बुटी या कोरोना जीवरक्षक औषधाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना वाटप करण्यात आले. आरोग्य दिंडी सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. गोकुळचे संचालकपदी निवड झाल्याबद्दल किसनराव चौगुले, शिरोळ नगराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमरसिंह माने - पाटील, विधार्थी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निहाल कलावंत यांची शाल, श्रीफळ मानाचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब देशमुख, यासीन मुजावर, हरिश्चंद्र पाटील, बाळासाहेब खैरे, रोहीत पाटील, ए. व्ही. आरळेकर, अनिरूद्ध गाडवी, संतोष मेंगाणे, रामराव इंगळे, मधुकर जांभळे, शिवानंद माळी, संभाजी पवार, श्वेता बडोदेकर, स्नेहल मठपती, अस्मिता पवार, स्वाती मोरे आदी उपस्थित होते.