कोविडचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा : जयश्री गायकवाड -जयसिंगपूर येथे गणेशोत्सव मंडळांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:50 AM2021-09-02T04:50:32+5:302021-09-02T04:50:32+5:30
येथील पोलीस ठाण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या वेळी पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र ...
येथील पोलीस ठाण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या वेळी पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वैंजणे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, दत्तात्रय बोरीगिड्डे प्रमुख उपस्थित होते. अप्पर पोलीस अधीक्षक गायकवाड म्हणाल्या, गणेशोत्सव साजरा करताना स्वागत व विसर्जन मिरवणुकीवर पूर्णपणे बंदी असून डॉल्बी लावल्यास अथवा मिरवणूक काढल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सार्वजनिक मंडळाची गणेशमूर्ती चार फुटांच्या वर नसावी. कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. महाप्रसाद अथवा कोणताही कार्यक्रम घेण्यास बंदी आहे. गणपती विसर्जन करताना प्रभागनिहाय उभारण्यात येणाऱ्या कुंडाचा वापर करावा. मंडळाने शक्य असल्यास सीसीटीव्ही बसवावेत, असेही आवाहन त्यांनी केले. या वेळी शहरातील विविध मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो - ०१०९२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - जयसिंगपूर येथे गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.