कोल्हापुरात साध्या पध्दतीने महाराष्ट्र दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:17 AM2021-05-03T04:17:58+5:302021-05-03T04:17:58+5:30
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी ध्वजारोहण करण्यात ...
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.दत्तात्रय कवितके, उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, प्रांताधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार अर्चना कापसे उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय काटेकोरपणे सामाजिक अंतरचे पालन करत आणि साधेपणाने करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात हा ध्वजारोहण कार्यक्रम साधेपणाने साजरा झाला.
चौकट
शासन निर्देशांचे काटेकोर पालन करावे
कोरोना साथीच्या कठीण प्रसंगात शिवाजी विद्यापीठाशी संबंधित सर्वच घटकांनी शासनामार्फत वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या निर्देशांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी शनिवारी केले. त्यांनी सकाळी आठ वाजता सर्व संबंधित घटकांना विद्यापीठाच्या ‘शिव वार्ता’ या युट्यूब वाहिनीद्वारे संबोधित केले. महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
फोटो (०२०५२०२१-कोल-महाराष्ट्र दिन ०१ व ०२ ) : कोल्हापुरात शनिवारी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शेजारी जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.