राजर्षी शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती सोहळा देशभर साजरा करा, कोल्हापुरात इंडिया आघाडीची स्मरण आंदोलनाव्दारे मागणी
By समीर देशपांडे | Published: June 17, 2024 01:47 PM2024-06-17T13:47:54+5:302024-06-17T13:48:36+5:30
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती सोहळा केंद्र व महाराष्ट्र राज्य शासनाने वर्षभर लोकोत्सव म्हणून देशभर ...
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती सोहळा केंद्र व महाराष्ट्र राज्य शासनाने वर्षभर लोकोत्सव म्हणून देशभर साजरा करावा अशी आग्रही मागणी इंडिया आघाडीच्यावतीने येथे करण्यात आली. शाहू समाधीस्थळी झालेल्या ‘स्मरण’आंदोलनाच्या माध्यमातून याची जाणीव शासनाला करून देण्यात आली. यावेळी शाहू महाराजांचा विजय असो, इंडिया आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला.
हा जयंती सोहळा सर्वत्र साजरा व्हावा यासाठी केंद्र आणि महाराष्ट्र शासनाला स्मरण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. देशभरातील संस्थांनिकांमध्ये समाजसुधारणेबाबत आग्रही भूमिका त्या काळात शाहू महाराजांनी घेतली. शिक्षणाची सक्ती केली. आरक्षणाची सुरूवात केली. अशा क्रांतीकारी निर्णय घेणाऱ्या या राजाची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती देशपातळीवर झाली पाहिजे अशी मागणी सर्वच वक्त्यांनी केली.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, ठाकरेसेनेचे संजय पवार, विजय देवणे, काॅंग्रेसचे सचिन चव्हाण, सागर चव्हाण, सतीशचंद्र कांबळे, संदीप देसाई, दिलीप पोवार, बाबुराव कदम यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.