रामनवमी सोहळा आज साधेपणानेे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:23 AM2021-04-21T04:23:57+5:302021-04-21T04:23:57+5:30

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी रामनवमी साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. तर अंबाबाई मंदिरातील रामाचा रथोत्सव यंदा होणार ...

Celebrate Ram Navami today simply | रामनवमी सोहळा आज साधेपणानेे

रामनवमी सोहळा आज साधेपणानेे

Next

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी रामनवमी साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. तर अंबाबाई मंदिरातील रामाचा रथोत्सव यंदा होणार नसल्याची माहिती पुजारी सुहास झुरळे, सुरेंद्र झुरळ व अनिल झुरळे यांनी दिली आहे.

छत्रपती चॅरिटेबल देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारीत असलेल्या अंबाबाई मंदिर परिसरातील राम मंदिरात गुढीपाडव्यापासून राम नवरात्र सुरू होते. या दिवसापासून अष्टमी पर्यंत पालखी सोहळा असतो व रामनवमीला श्री रामाचा रथोत्सव असतो. मात्र यंदा कोरोना संसर्गामुळे रामनवमीला रथ काढण्यात येणार नाही. त्याऐवजी मंदिर परिसरातच पालखी काढण्यात येणार आहे. धार्मिक विधी मंदिर परिसरातच पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीतच पार पडतील. आज बुधवारी सकाळी महाभिषेक होईल. दुपारी १२ वाजता मंदिरात मानकरी व पुजारी यांच्या उपस्थितीत जन्मकाळ सोहळा पार पडेल. सायंकाळी पालखी सोहळा व रात्री कार्यक्रमांची सांगता होईल. तसेच शहरातील सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद असतील.

---

---

Web Title: Celebrate Ram Navami today simply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.