मगदूम अभियांत्रिकीकडून राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:25 AM2021-09-27T04:25:35+5:302021-09-27T04:25:35+5:30
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात ...
जयसिंगपूर : येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन असे विविध कार्यक्रम पार पडले.
पहिल्या सत्रात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. एस. एस. आडमुठे, प्रभारी प्राचार्या डॉ. एस. बी. पाटील, प्रा. पी. पी. पाटील, प्रा. पी. ए. चौगुले, प्रा. आर. डी. माने यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
दुसऱ्या सत्रात जयसिंगपूर कॉलेजचे प्रा. डॉ. प्रभाकर माने यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, राष्ट्रीय चारित्र्य व संस्कारक्षम नागरिक बनविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची कास धरणे काळाची गरज आहे. त्याचबरोबर संवेदनशील व्यक्ती म्हणून नि:स्वार्थी भावनेने परंतु सेवाभावी वृत्तीने सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी या दिनाचे औचित्य साधून सेवाभाव हा धर्म मानून आपले कार्य अविरतपणे सुरू ठेवले पाहिजे.
स्वागत प्रा. पी. ए. चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन शिवानी अंबरगे, प्रा. आर. डी. माने यांनी केले. कार्यक्रमासाठी अभिषेक भंडारे, रोहित पुजारी, श्वेता कारंडे, प्राची कोथळे, स्नेहल पाटील, निखिल राजमाने यांनी परिश्रम घेतले.
फोटो - २६०९२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ -
जयसिंगपूर येथील डॉ. जे. जे. मगदूम अभियांत्रिकीच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.